Hemant Dhome Post: नवरा असावा तर असा! पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; करीनाच्या चित्रपटातील कामावर अभिनेता फिदा

मुंबई: 'रश्मी रॉकेट' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोग हिने काम केलं आहे. मराठी सिनेविश्वात क्षितीने अनेक टेलिव्हिजन सिरियल आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर क्षिती सध्या बॉलिवूड चित्रपटांकडे वळताना दिसत आहे. अभिनेत्री क्षिती जोग अभिनेत्री करीना कपूर खानच्या 'दायरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दायरा' चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेने खास पत्नीसाठी इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. हेमंतने पत्नीचं कौतुक करणारी खास पोस्ट शेअर केलेली आहे.



अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "तुझ्या ताकदीचा 'दायरा', आपल्या माणसाचं काम आपण सेलिब्रेट केलंच पाहिजे! तेव्हा न लाजता बोलून घेतो! तू अफाट कॅलिबर असलेली अभिनेत्री आहेस, हे मला आणि अनेकांना माहित होतंच… पण आता जे 'दायरा' मधील तुझं काम बघतील तेही या यादीत जोडले जातील… जोडले जात आहेत… आज तुझं कौतुक बघून मन येड्यासारखं खूश आहे… क्षिती ही तर सुरूवात आहे… तुला अजून खूप काही करायचं आहे… माझ्यासकट सगळ्यांनाच तुझी अशीच सरस कामं बघायची आहेत… तू चाल पुढं… मी आहेच! तुझं प्रत्येक कमाल काम सेलिब्रेट करायला कायम… त्या अनेक टाळ्यांमधली सगळ्यात जोरात आवाज करणारी टाळी आपलीच असणार मालकीणबाई! खूप खूप प्रेम आणि प्रचंड अभिमान! LOVE YOU & SO SO SO PROUD OF YOU! You are a star! Rise. Reset. Repeat."

 



पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये हेमंतने चाहत्यांना क्षितीचा 'दायरा' चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. करीना कपूर खान आणि पृथ्वीराज प्रमुख भूमिकेत असलेले 'दायरा' चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. ह्या संपूर्ण प्रकरणावर हा चित्रपट आधारित असून प्रकरण घडल्यापासून ते प्रकरणाचा तपास आणि आरोपींना शिक्षा कशा पद्धतीने देण्यात आली, याविषयावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक अनोख्या पद्धतीने सादर करण्याची कला दिग्दर्शकांनी दाखवली आहे. मेघना गुलजार ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या कथानकाचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. शिवाय, चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक प्रेक्षकांकडून केले जात आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कळेल.

Comments
Add Comment

Aishwarya Shete: ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये ऐश्वर्या शेटेचा एलिगंट लूक

[caption id="attachment_1072170" align="aligncenter" width="800"] मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाला कोट्यवधींच्या खंडणीची धमकी! लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. टायगर श्रॉफ नंतर आता आणखी एका

Bigg Boss 20: ‘मला पैसेसुद्धा नकोत!’ माही विजचा संताप, बिग बॉस २० मधून घेणार एक्झिट?

बिग बॉस २० या टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सध्या नातेसंबंध आणि एकमेकांबद्दलची वक्तव्ये या दोन्ही बाबतीत मोठा drama

Adinath Kothare Movie: सेटवर पाऊल ठेवणं म्हणजे, मंदिरात प्रवेश करण्यासारखं...आदिनाथ कोठारेचं रामायण चित्रपटामधील आठवणी

Adinath Kothare Ramayana Movie: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie)

'दृश्यम 3' ने ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या इतर सर्व बॉलिवूड चित्रपटांना टाकलं मागे; कमाईची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क

ऑक्टोबर २०२६ चा महिना बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांमध्ये

Salman Khan New Song controversy: 'तेरी सेक्सी ब्यूटी' या सलमानच्या नव्या गाण्याने चाहते संभ्रमात;  युद्धपटात रोमँटिक गाणं का?

Salman Khan New Song controversy: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांनी त्यांच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi) या