Adinath Kothare Movie: सेटवर पाऊल ठेवणं म्हणजे, मंदिरात प्रवेश करण्यासारखं...आदिनाथ कोठारेचं रामायण चित्रपटामधील आठवणी

'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचे काही अनुभवही त्याने यावेळी शेअर केले आहेत. तसेच, आदिनाथची 'रामायण' या सिनेमासाठी निवड कशी झाली? याचाही किस्सा त्याने यावेळी सांगितला.

Adinath Kothare Ramayana Movie: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) हा प्रदर्शित होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. या भव्य सिनेमात मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. त्यात मराठी मनोरंजन विश्वातील आदिनाथ कोठारे यानं प्रभू श्रीरामांचे धाकटे बंधू 'भरत' यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान होणाराच्या गमती जमतीचे अनुभव आणि सेटवरील वातावरणाबद्दल आदिनाथ कोठारे याने अतिशय दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.


एका मुलाखती दरम्यान, आदिनाथ कोठारे यानं सांगितलं की, सेटवर एखाद्या मंदिरात असल्यासारखं वाटत होतं. त्यानं दिग्दर्शक नितेश तिवारी यांचं देखील कौतुक केलं आणि अगदी आवर्जून सांगितलं की, त्यांनी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडेही बारकाईनं लक्ष दिलंय. तसेच, सेटवरील वातावरण अत्यंत शिस्तबद्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचे काही अनुभवही त्याने यावेळी शेअर केले आहेत. तसेच, आदिनाथची 'रामायण' या सिनेमासाठी निवड कशी झाली? याचाही किस्सा त्याने यावेळी सांगितला.



"रामायण'मधील माझा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. तो अनुभव प्रत्यक्ष घेतलाच पाहिजे. चित्रपटाचं भव्य स्वरूप आणि त्याचं महत्त्व मला पहिल्याच दिवशी जाणवलं..." आम्ही अयोध्येतील एका प्रसंगाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी रणबीर कपूर, रवी दुबे, साई पल्लवी, अरुण गोविल यांच्यासह इतर सगळे कलाकार उपस्थित होते. त्यावेळी त्या सेटवर उभं राहून पहिला सीन साकारताना आम्ही अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र, तिथून बाहेर पडून घरी गेल्यानंतर आपण नेमकं काय केलं? याची जाणीव झाली. मला अजूनही आठवतंय, मी आई-वडिलांना सांगितलं होतं की, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. देशातील अनेक सर्वोत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, ही खूप आनंदाची गोष्ट होती.


दरम्यान, पहिल्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो. सुरुवातीच्या काही दिवसांत कलाकार म्हणून आपण त्या व्यक्तिरेखेला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सेटवर स्वतःला कसं वावरायचं, इतर कलाकारांबरोबरच नातं कसं असेल, याचा अंदाज घेत असतो. एकदा आम्ही एका सीनसाठी उभे होतो. त्यावेळी मी, श्रीराम, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे सगळे जण तिथे होतो. त्यावेळी आम्ही त्या सीनचा सराव करत होतो. त्यावेळी माझ्या मनात काहीतरी वेगळं करण्याचा विचार आला होता; पण मी घाबरलो होतो. त्यामुळे नितेश सरांनी सांगितल्याप्रमाणेच करत होतो. शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी जे करण्याचा विचार करत होतो, तेच करण्याचा सल्ला दिला. मी तसं केलं आणि शॉट संपल्यानंतर नितेश सरांनी मोठ्याने माझं कौतुक केलं. त्या क्षणामुळे माझा संकोच दूर झाला आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग झालो..."

Comments
Add Comment

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाला कोट्यवधींच्या खंडणीची धमकी! लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. टायगर श्रॉफ नंतर आता आणखी एका

Bigg Boss 20: ‘मला पैसेसुद्धा नकोत!’ माही विजचा संताप, बिग बॉस २० मधून घेणार एक्झिट?

बिग बॉस २० या टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सध्या नातेसंबंध आणि एकमेकांबद्दलची वक्तव्ये या दोन्ही बाबतीत मोठा drama

'दृश्यम 3' ने ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या इतर सर्व बॉलिवूड चित्रपटांना टाकलं मागे; कमाईची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क

ऑक्टोबर २०२६ चा महिना बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांमध्ये

Salman Khan New Song controversy: 'तेरी सेक्सी ब्यूटी' या सलमानच्या नव्या गाण्याने चाहते संभ्रमात;  युद्धपटात रोमँटिक गाणं का?

Salman Khan New Song controversy: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांनी त्यांच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi) या

Salman Khan new song released: ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सलमान खानच्या आवाजाची जादू; ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे प्रदर्शित!

Salman Khan new song released: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्या जोडीचे ‘तेरी सेक्सी

Jailer 2 OTT Release : रजनीकांत यांच्या 'जेलर 2'चा ओटीटीवर अनकट व्हर्जन येणार ! पण कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर ? जाणून घ्या

Jailer 2 OTT Release : सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने