Delhi Gang Rape : दिल्ली हादरली! सामूहिक बलात्कारानंतर मुलीवर सपासप वार, कुजलेल्या मृतदेहाची कुत्र्यांनी...;अंगावर काटा आणणारा प्रकार

 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या; 19 वर्षीय तरुणासह 3 अल्पवयीन ताब्यात


दिल्ली : राजधानी दिल्लीत 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणासह 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. स्वरूप नगर परिसरातील एका शेतात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


पोलिसांना रविवारी सकाळी कुशक रोडजवळील शेतात मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मृतदेहाची अवस्था खराब झाल्याने सुरुवातीला मुलीची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.



तपासादरम्यान पोलिसांना संशयास्पद वेळेत घटनास्थळाजवळून एक टेम्पो जाताना दिसला. वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नसला तरी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीतून पोलिसांनी टेम्पोचा शोध घेतला. चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं.



मित्राला भेटण्यासाठी गेली अन्...


पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक 17 वर्षीय मुलगा पीडित मुलीच्या संपर्कात होता. मुलगी त्याला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर त्याच्या इतर मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पुढे तिला शेताच्या परिसरात नेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात बलात्काराची पुष्टी झाली असून मुलीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. या प्रकरणी बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



आरोपी पकडण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु


आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच आरोपींच्या हालचाली आणि टेम्पोच्या मार्गाचा मागोवा घेण्यात आला. तपासादरम्यान 2 चाकू आणि आरोपींचे कपडेही जप्त करण्यात आले आहेत.


पोलिसांकडून आता या घटनेचा संपूर्ण क्रम तपासला जात आहे. आरोपींची नेमकी भूमिका, घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि गुन्हा नेमका कुठे घडला, याचा तपास सुरू आहे. जप्त केलेले पुरावे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


Comments
Add Comment

GK: पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात जावे लागते का? वाचा काय आहेत नियम!

विदेशवारी करायचं म्हंटलं तर पासपोर्ट हवाच. त्याशिवाय विदेशवारी करूच शकत नाही. पण पासपोर्ट काढताना अनेकदा

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी समिती, शेतकऱ्यांना विकसित भूखंड

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी 22 सप्टेंबर 2026 रोजी झाली. या बैठकीत दुष्काळ निवारणासह मुंबईतील

Devendra Fadnavis : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ समिती

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार मुंबई : राज्यावर

बाईईईई हा काय प्रकार! डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ? शाळा प्रशासनाचा अजब अट्टाहास

मुंबई : मिरा-भाईंदर (Mira-BHayandar) परिसरातील शाळांमध्ये पर्यूषण पर्वाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आहारावर लादल्या

Garba Partner For Rent : गरबा पार्टनर भाड्याने देण्याच्या जाहिराती व्हायरल; सायबर फसवणुकीचा धोका, भाजप नेत्याची पोलिसांकडे तक्रार

Garba Partner For Rent : नवरात्री आणि गरबा उत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच सोशल मीडियावर ‘Rent A Garba Partner’ या नावाने काही जाहिराती

Asian Games 2026: भारताच्या खात्यात सुवर्णपदक, आशिया कपनंतर एशियन गेम्समध्येही महिला संघाचा डंका

IND W vs SL W Final: एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या