Olympia Coffee House : मुंबईतील प्रसिद्ध ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर FDA ची कारवाई; अस्वच्छता आढळल्याने परवाना निलंबित

अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; 14 खाद्य आस्थापनांवर निलंबनाची कारवाई


मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न सुरक्षा विभागाकडून तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील 14 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये कुलाबा येथील 108 वर्षे जुन्या ऑलिम्पिया कॉफी हाऊसचाही समावेश आहे.


ग्राहकाकडून आलेल्या तक्रारीनंतर FDA च्या पथकाने 16 सप्टेंबर रोजी ऑलिम्पिया कॉफी हाऊसची तपासणी केली. यावेळी अन्न साठवण्याच्या ठिकाणी मूत्रपात्र, झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव आढळून आला. तसेच रेफ्रिजरेटरमध्ये मांसाच्या रक्ताचे अवशेष आणि थेट फरशीवर अन्न हाताळले जात असल्याचे तपासणीत समोर आले. (Olympia Coffee House)



याशिवाय अन्न तयार करण्याची आणि भांडी धुण्याची जागा अस्वच्छ असल्याचे आढळले. पाण्याची स्वच्छता, कच्च्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवणूक तसेच खराब झालेल्या लाकडी कापण्याच्या फळ्यांबाबतही त्रुटी आढळल्या. अन्न हाताळणारे कर्मचारी आवश्यक सुरक्षा कपडे वापरत नसल्याचे FDA ने सांगितले. 35 कर्मचाऱ्यांपैकी 34 जणांनी अनिवार्य अन्न सुरक्षा प्रशिक्षण घेतलेले नसल्याचेही समोर आले.


या कारणांमुळे ऑलिम्पिया कॉफी हाऊसचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला असून, त्रुटी दूर होईपर्यंत अन्नाची खरेदी, तयारी, साठवणूक, विक्री आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


नायर रुग्णालयातील कॅन्टीनवरही स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. याशिवाय चेंबूरमधील Blink Commerce, घाटकोपर पश्चिम येथील विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स, A-1 General and Dry Fruits, वरळीतील मिलन पंजाब आणि मालाड पूर्व येथील सद्गुरू स्वीट्ससह इतर आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. ( FDA takes action)


या मोहिमेत FDA ने 27 खाद्य आस्थापनांची तपासणी केली असून, 13 आस्थापनांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यभरातून 7.38 लाख रुपये किमतीचे 2,813 किलो दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच 4.66 लाख रुपये किमतीचे 2,580.7 किलो खाद्यपदार्थ आणि 12.5 लिटर ताडी जप्त करण्यात आली.

Comments
Add Comment

National Pension Scheme : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना

स्थायी समितीने दिली पेन्शन योजनेला मंजुरीची दावे महापालिका मंजूर करणार, अधिदान एनएसडीएल काढणार मुंबई (विशेष

iPhone 18 Pro : iPhone 18 Pro ची भारतात विक्री सुरू! खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळूरमध्ये रात्रीपासूनच ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांचा रांगा

मुंबई : ॲपलच्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी म्हणाले...

सीबीआयच्या नव्या FIR नंतर प्रकरण पुन्हा चर्चेत मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम