Friday, September 18, 2026

iPhone 18 Pro : iPhone 18 Pro max खरेदीचा प्लॅन करताय? थांबा आधी EMI चं हे गणित जाणून घ्या

iPhone 18 Pro : iPhone 18 Pro max खरेदीचा प्लॅन करताय? थांबा आधी EMI चं हे गणित जाणून घ्या

6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI, ट्रेड-इन आणि इन्स्टंट कॅशबॅकचा पर्याय

मुंबई : ॲपलचे नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. दोन्ही मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना Apple India Store वरून हे फोन खरेदी करता येणार आहेत. नवीन प्रो आयफोन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून EMI, इन्स्टंट कॅशबॅक आणि ट्रेड-इनसारखे पर्याय देण्यात आले आहेत.

आयफोन १८ प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी ईएमआय योजना

iPhone 18 Pro Max च्या 256GB मॉडेलची किंमत 1,79,900 रुपये आहे. 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI आणि लागू कॅशबॅकनंतर सुरुवातीचा EMI 28,817 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. 512GB मॉडेलची किंमत 2,04,900 रुपये असून त्याचा EMI 32,983 रुपयांपासून सुरू होतो. 1TB मॉडेलची किंमत 2,54,900 रुपये असून त्याचा सुरुवातीचा EMI 41,317 रुपये आहे. तर 2TB मॉडेलची किंमत 3,29,900 रुपये असून EMI 53,817 रुपयांपासून सुरू होतो.

आयफोन १८ प्रो खरेदी करण्यासाठी ईएमआय योजना कशी असेल ? 

ऍपलच्या म्हणण्यानुसार, iPhone 18 Pro च्या 256GB मॉडेलची किंमत 1,64,900 रुपये आहे. इन्स्टंट कॅशबॅकनंतर त्याचा सुरुवातीचा EMI 26,316 रुपये आहे. 512GB मॉडेलची किंमत 1,89,900 रुपये असून EMI 30,483 रुपयांपासून सुरू होतो. 1TB मॉडेलसाठी 2,39,900 रुपये मोजावे लागतील आणि त्याचा EMI 38,817 रुपयांपासून सुरू होतो. 2TB मॉडेलची किंमत 3,14,900 रुपये असून EMI 51,317 रुपयांपासून सुरू होतो.

जुन्या फोनच्या बदल्यात ट्रेड-इनचा पर्यायही ग्राहकांना मिळणार आहे. फोनचे मॉडेल आणि त्याची स्थिती पाहून 4,500 ते 81,500 रुपयांपर्यंत क्रेडिट मिळू शकते. यामुळे नवीन आयफोनची किंमत कमी होण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय American Express, Axis Bank आणि ICICI Bank यांच्या पात्र कार्डवर खरेदी केल्यास 7,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकतो. त्यामुळे फोन खरेदी करण्यापूर्वी EMI, कार्ड ऑफर आणि जुन्या फोनच्या ट्रेड-इन मूल्याची तुलना केल्यास अंतिम खर्च किती होईल, याचा अंदाज ग्राहकांना घेता येईल.

   
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >