नवीन आयफोनच्या खरेदीसाठी Apple Store बाहेर ग्राहकांची गर्दी
दिल्लीतील साकेत येथील Select Citywalk मॉलमधील ॲपल स्टोअरबाहेर सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी वाढली. अजय नावाच्या ग्राहकाने iPhone 18 Pro Max चे 1TB मॉडेल आधीच प्री-बुक केल्याचं सांगितलं. सध्या ते iPhone 17 Pro वापरत असून, नव्या मॉडेलमध्ये कोणते बदल आणि नवीन फीचर्स मिळणार आहेत, याची त्यांना उत्सुकता आहे.टेक रिव्ह्यू चॅनल चालवणारे सूरज चौहान हे देखील नवीन आयफोन घेण्यासाठी स्टोअरबाहेर रांगेत उभे होते. स्मार्टफोनमध्ये आपल्याला विशेष रस असल्याचं सांगत त्यांनी यापूर्वी iPhone 17 Pro घेतल्याचं नमूद केलं. यावेळी iPhone 18 Pro Max घेण्यासाठी आलो असून, कॅमेरा आणि फोनच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेरही ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. काही ग्राहक संपूर्ण रात्र स्टोअरबाहेर थांबले होते. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक आल्याने स्टोअर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.#WATCH | Delhi | Apple begins the official sale of the iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max; customers throng the company's store at Select City Walk Mall in Saket pic.twitter.com/c32tbBVbiL
— ANI (@ANI) September 18, 2026
नवीन iPhone 18 Pro आणि Pro Max मधील फीचर्स, कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, याकडे आता ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.View this post on Instagram






