Mumbai Cyber Crime : नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं अन् जाळयात अडकवलं ! 'डिजिटल अरेस्ट'ची भीती घालत दोन ज्येष्ठ नागरिकांकडून कोट्यवधी उकळले

Mumbai Cyber Crime : मुंबईतील मालाड परिसरात सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 14 दिवस घराबाहेर न पडण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, तसेच दहशतवादी संघटनेला निधी दिल्याचा बनाव रचून या दोन्ही नागरिकांकडून तब्बल 1 कोटी 63 लाख 80 हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.



नाशिक पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक


मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर रोड परिसरात राहणारे 76 वर्षीय सायमन अलेक्झांडर कोरिया यांना 1 सप्टेंबर 2026 रोजी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. पोलिसांच्या गणवेशातील व्यक्तीने आपण नाशिक पोलीस अधिकारी ‘संजय पिसे’ असल्याचे सांगितले. कोरिया यांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून एका बँक खात्यातून तब्बल 2 कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे सांगत त्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर बँक खात्याच्या पडताळणीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. भामट्यांच्या सांगण्यावरून कोरिया यांनी टप्प्याटप्प्याने 63 लाख 60 हजार 47 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.



दहशतवादी संघटनेला निधी दिल्याचा बनाव


दुसऱ्या घटनेत मालाडच्या धीरज पूजा सोसायटीतील 72 वर्षीय संतानो अलेक्झांडर अँड्रेडे यांना सायबर ठगांनी लक्ष्य केले. 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत त्यांना घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा बनाव करण्यात आला. भामट्यांनी नाशिक पोलीस मुख्यालयातील आयपीएस अधिकारी आणि ‘संदीप राव’ नावाचा पोलीस कर्मचारी असल्याचे भासवले. अँड्रेडे यांच्या डेबिट कार्डचा वापर दहशतवादी संघटनेला निधी देण्यासाठी झाल्याचा खोटा आरोप करण्यात आला. या कथित प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी भीती दाखवून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील सर्व मुदत ठेवी मोडून घेण्यास भाग पाडत भामट्यांनी 89 लाख 80 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून घेतले.



सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू


दोन्ही घटनांमध्ये मिळून ज्येष्ठ नागरिकांची 1 कोटी 63 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली.मुंबई सायबर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांची नोंद करून तपास सुरू केला आहे. पैसे ज्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, त्या खात्यांची माहिती तसेच संबंधित कॉल डिटेल्स तपासल्या जात आहेत. या माध्यमातून सायबर भामट्यांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

Comments
Add Comment

BCCI AGM : BCCIच्या वार्षिक बैठकीत IPL, बजेट अन् शताब्दी सोहळ्याबाबत मोठे निर्णय; जाणून घ्या १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शुक्रवारी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी

Hemant Dhome Post: नवरा असावा तर असा! पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; करीनाच्या चित्रपटातील कामावर अभिनेता फिदा

मुंबई: 'रश्मी रॉकेट' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती

Crime News : फ्रीजमध्ये ५ वर्षांच्या लेकीचा मृतदेह, वडिलांची आत्महत्या; खोलीत फुगे, मेणबत्त्या अन् ३ सुसाइड नोट्स... नेमकं प्रकरण काय?

अमरेली : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे एका वडिलांनी आपल्या ५ वर्षीय मुलीची हत्या

Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील धोकादायक भोस्ते घाटात केमिकलने भरलेला टँकर भीषण अपघातात दरीत

BMC : मुंबईत वायू प्रदुषणाची भीती, महापालिका यंत्रणा अलर्ट

येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल