Diwali Cleaning: दिवाळीसाठी करा एका दिवसात साफसफाई; कशी ते जाणून घेऊया

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी स्वच्छ घरात अवतरते. त्यामुळे, लोक सणापूर्वी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करतात. पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि घराची साफसफाई करायची असेल तर या सोप्या पद्धती जाणून घ्या.

Diwali Cleaning: दिवाळीला अवघे काही तास उरले आहेत. परंतु अजूनही घराची साफसफाईही करायची बाकी आहे, वेळ कमी असल्यामुळे धावपळ होत आहे. अस म्हणतात की, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी स्वच्छ घरात अवतरते. त्यामुळे, लोक सणापूर्वी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करतात. पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि घराची साफसफाई करायची असेल तर या सोप्या पद्धती जाणून घ्या.


घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. परंतु घरातील सर्वच जागेची स्वछता करायची म्हणजे बराच वेळ जातो. अशावेळी योग्य नियोजन केल्यास अवघ्या एका दिवसात संपूर्ण घराची साफसफाई पूर्ण करता येऊ शकते. सगळ्यात आधी घरातील पसारा आवरा. घरात विखुरलेल्या वस्तू व्यवस्थित आवरून ठेवा. कपडे, चपला, पुस्तके आणि इतर वस्तू त्यांच्या जागी ठेवा. अनेक दिवसांपासून वापरात नसलेल्या वस्तू वेगळ्या काढा. यामुळे साफसफाई करताना अडथळा येणार नाही आणि वेळेचीही बचत होईल.


बेडरूम मधील बेडचे बेडशीट आणि उशांचे कव्हर बदला. कपाट, टेबल, पंखे, खिडक्या आणि दरवाजांवरील धूळ पुसून काढा. बेड खालील जागा आणि खोलीचे कोपरेही स्वच्छ करा. कपाटातील वस्तू व्यवस्थित लावून शेवटी फरशी पुसून घ्या. तसेच घरात येणाऱ्या पाहुण्यांचे सगळ्यात आधी हॉलकडे लक्ष जाते. त्यामुळे हॉलच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. सोफा, कुशन, टेबल आणि टीव्ही कॅबिनेट स्वच्छ पुसून घ्या. मळलेले पडदे धुवून घ्या किंवा बदला. भिंती आणि खिडक्यांवरील धूळ काढा. हॉल अधिक आकर्षक दिसण्यासाठी एखादे छोटे रोप किंवा सजावटीची वस्तू ठेवू शकता.



त्यानंतर किचनची साफसफाई करताना आधी गॅस शेगडी आणि आसपास साचलेला तेलकटपणा आधी स्वच्छ करा. त्यानंतर किचन ओटा, सिंक, टाइल्स आणि कॅबिनेट पुसून घ्या. मसाल्यांचे डबे आणि फ्रिज स्वच्छ करा. एक्सपायरी डेट गेलेले पदार्थ आणि निरुपयोगी डबे बाहेर काढून शेवटी फरशी पुसून घ्या. यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाथरूमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. रूमच्या साफसफाईसोबत बाथरूम स्वच्छ करणेही आवश्यक आहे. बाथरूममधील रिकामे डबे आणि नको असलेल्या गोष्टी बाहेर काढा. टॉयलेट सीट, वॉश बेसिन, नळ आणि शॉवर क्लीनरच्या मदतीने स्वच्छ करा. टाइल्सवर साचलेली घाण ब्रशने काढा. आरसा आणि दरवाजा पुसून शेवटी फरशी स्वच्छ धुऊन कोरडी होऊ द्या. हे सगळं झाल्यानंतर हॉल, किचन, रूम्स मध्ये एकदा झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनर फिरवा. त्यानंतर लादी पुसून घ्या. दरवाजे आणि खिडक्याही स्वच्छ कापडाने पुसा. घरात ताजी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. साफसफाई पूर्ण झाल्यानंतर रांगोळी, फुले आणि पणत्यांनी घर सजवा. एका दिवसात करा घराची साफसफाई.

Comments
Add Comment

शाहरूख- दीपिकाचा King कमाईमध्ये 'किंग' ठरला; ओटीटी, म्युझिक अन् सॅटेलाईट राईट्समध्ये कमावले कोट्यवधी

मुंबई: सिद्धार्थ आनंद, शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा 2023 साली 'पठाण' चित्रपट रिलीज झाला होता. आता तब्बल तीन

Dhanteras: धनत्रयोदशी म्हणजे काय? त्यामागील कथा तुम्हाला माहित आहे का?

Dhanteras Katha: दिवाळी सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक न्यासाला राम मॅन्शनच्या खरेदीवरील मुद्रांक शुल्क माफ, भाविकांच्या सुविधांसाठी निर्णय

मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

PAT Exam: ‘पीएटी’ परिक्षेची तारीख आली, विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी

पाणी टंचाईतील थकित बिले तातडीने देण्याचे निर्देश; चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक