WPL 2027: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचं बिगुल वाजलं, असं आहे वेळापत्रक; सर्व माहिती एका क्लिकवर

WPL 2027: वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊयात या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत..

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी नुकतीच मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. या लिलाव प्रक्रियेनंतर स्पर्धा कधी होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार असून बीसीसीआयने बुधवारी वेळापत्रक जाहीर केलं. प्लेऑफसह डब्ल्यूपीएल 2027 चे सर्व 22 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होतील. ही स्पर्धा वडोदरा आणि मुंबईत होणार आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 11 सामने होणार आहेत. 14 जानेवारीपासून वडोदरामध्ये या स्पर्धेला सुरूवात होईल. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिली लढत होईल. वडोदऱ्यात पहिल्या टप्प्यातील 11 सामने 24 जानेवारीपर्यंत होतील. त्यानंतरचे सामने मुंबईत होतील. मुंबई ब्रेबॉर्न स्टेडियमवर 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान साखळी फेरीचे सामने होतील.


साखळी फेरीत अव्वल स्थानी असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत खेलण्याची संधी मिळेल. तर एलिमिनेटर सामना 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात गुणतालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले संघ अंतिम सामन्यातील स्थानासाठी स्पर्धा करतील. एलिमिनेटरमधील विजेता संघ 7 फेब्रुवारी रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीसाठी थेट पात्र ठरेल.



वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक






































































































































































सामना तारीख होम टीम पाहुणा संघ स्थळ
1 बुधवार, 14 जानेवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मुंबई इंडियन्स वडोदरा
2 गुरुवार, 15 जानेवारी गुजरात जायंट्स यूपी वॉरियर्स वडोदरा
3 शुक्रवार, 16 जानेवारी दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वडोदरा
4 शनिवार, 17 जानेवारी यूपी वॉरियर्स मुंबई इंडियन्स वडोदरा
5 रविवार, 18 जानेवारी गुजरात जायंट्स दिल्ली कॅपिटल्स वडोदरा
6 सोमवार, 19 जानेवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यूपी वॉरियर्स वडोदरा
7 मंगळवार, 20 जानेवारी गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स वडोदरा
8 बुधवार, 21 जानेवारी यूपी वॉरियर्स दिल्ली कॅपिटल्स वडोदरा
9 गुरुवार, 22 जानेवारी गुजरात जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वडोदरा
10 शुक्रवार, 23 जानेवारी दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स वडोदरा
11 शनिवार, 24 जानेवारी यूपी वॉरियर्स गुजरात जायंट्स वडोदरा
12 सोमवार, 26 जानेवारी मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मुंबई-सीसीआय
13 मंगळवार, 27 जानेवारी दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स मुंबई-सीसीआय
14 बुधवार, 28 जानेवारी मुंबई इंडियन्स यूपी वॉरियर्स मुंबई-सीसीआय
15 गुरुवार, 29 जानेवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्स मुंबई-सीसीआय
16 शुक्रवार, 30 जानेवारी मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्स मुंबई-सीसीआय
17 शनिवार, 31 जानेवारी यूपी वॉरियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मुंबई-सीसीआय
18 रविवार, 01 फेब्रुवारी मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स मुंबई-सीसीआय
19 सोमवार, 02 फेब्रुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुजरात जायंट्स मुंबई-सीसीआय
20 मंगळवार, 03 फेब्रुवारी दिल्ली कॅपिटल्स यूपी वॉरियर्स मुंबई-सीसीआय
21 गुरुवार, 05 फेब्रुवारी एलिमिनेटर – मुंबई-सीसीआय
22 शनिवार, 07 फेब्रुवारी अंतिम – मुंबई-सीसीआय

WPL 2027 संपूर्ण संघ


मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, हिली मॅथ्यूज, अमनजोत कौर, अमेलिया केर, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजना सजीवन, राहिला फिरदौस, निकोला केरी, वैष्णवी शर्मा, तारा नॉरिस, दिशा कसत, भारती रावल, लतिका ईनामदार, अक्षिता भगर, श्वेता सेहरावत, सानिका चाळके.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), एलिस पेरी, लॉरेन बेल, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, नादिन डी क्लार्क, राधा यादव, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वॉल, जेस जोनासेन, तेजल हसबनीस, सायली सातघरे, क्लो ट्रायोन, प्रेमा रावत, वृंदा दिनेश, कुमार प्रथमोषा.


दिल्ली कॅपिटल्स: जेमिमाह रॉड्रिग्ज (कर्णधार), शफाली वर्मा, मार्जियान कॅप, निकी प्रसाद, लॉरा वोल्वार्ड, चिनेल हेन्री, श्री चरणी, दिया यादव, ममता माडीवाला, नंदनी शर्मा, लुसी हॅमिल्टन, मिन्नू मणी, ॲनाबेल सदरलँड, किरण नवगिरे, उमा कश्वी, किरस्टी गॉर्डन, नझमा खान.


यूपी वॉरियर्स: मेग लॅनिंग (कर्णधार), दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, क्रांती गौड, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, प्रतिका रावल, सोफी मोलिनक्स, ग्रेस हॅरिस, सुषमा वर्मा (विकेटकीपर), स्नेह राणा, सहाना पवार, मनाली दक्षिणी, काथरिन ब्रायस, आशा शोभना.


गुजरात जायंट्स: ॲश्लेह गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी, सोफी डेव्हाईन, रेणुका सिंग ठाकूर, भारती फुलमाली, कशवी गौतम, कनिका आहुजा, तनुजा कंवर, जॉर्जिया वेरेहम, अनुष्का शर्मा, हॅप्पी कुमारी, किम गर्थ, यास्तिका भाटिया, राजेश्वरी गायकवाड, जिंतीमनी कलिता, जी कमालिनी, ऑर्ला प्रेन्डरगास्ट, समैरा राघव.

Comments
Add Comment

न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video

भारताने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 185 धावांचं

विराट-अर्शदीपवर भारी पडला 25 वर्षांचा गोलंदाज! फक्त 2 विकेट्स घेत अंशुलने कसा हिसकावला सामनावीरचा किताब?

[caption id="attachment_1072203" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या

IND VS NZ: पहिला वनडे सामना कुठे फिरला? कर्णधार शुभमन गिलने शून्यावर बाद झालेल्या रोहितला दिलं श्रेय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेची सुरूवात विजयाने झाली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात भारताने

IND vs NZ, 1st ODI: भारताने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला पाजलं पराभवाचं पाणी, असा झाला सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरू असून पहिल्याच सामन्यात भारताने सरशी घेतली. या सामन्यात नाणेफेकीचा

विराट कोहलीचा सुपरमॅन कॅच! धनुष्य-बाण सेलिब्रेशन पाहून चाहते म्हणाले, ‘रामायणाचा प्रचार सुरू आहे का?’

ऑकलंड येथील ईडन पार्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात माजी भारतीय

IND vs NZ 1st ODI: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला नवा इतिहास

[caption id="attachment_1072039" align="aligncenter" width="800"] ऑकलँडच्या ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीच्या