Philippines School Shooting : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 17 जण जखमी

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शुक्रवारी (18 सप्टेंबर) एका शाळेत झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. दक्षिण कोटाबाटो प्रांतातील बंगा नॅशनल हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाल्याची ताजी माहिती फिलीपिन्सच्या सामाजिक कल्याण आणि विकास विभागाने (DSWD) दिली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


घटनेनंतर पोलिसांनी परिसराची पाहणी सुरू केली असून गोळीबारामागील नेमके कारण आणि घटनेचा तपशील तपासला जात आहे. सुरुवातीच्या अहवालांमध्ये मृत आणि जखमींच्या संख्येबाबत वेगवेगळी माहिती समोर आली होती. त्यामुळे अधिकृत तपासानंतरच अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे.



गोळीबारच्या घटनेने परिसरात खळबळ


घटनेनंतर बंगा परिसरातील सर्व स्तरांवरील शाळांमधील वर्ग तातडीने स्थगित करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. जखमी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.


फिलीपिन्सच्या शिक्षण विभागाने या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता असल्याचे विभागाने म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांत राहावे आणि घटनेशी संबंधित अप्रमाणित माहिती किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभावित विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि सामाजिक मदत देण्याची तयारीही शिक्षण विभागाने दर्शवली आहे.


फिलीपिन्समध्ये गेल्या काही महिन्यांत शाळांमध्ये गोळीबाराच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बंगा येथील घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

इस्रायल निवडणूक आयोगाचा निर्वाळा: मतदानात गैरप्रकार नाही, नेतन्याहूंचा आरोप फेटाळला

इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही गैरप्रकार किंवा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताला मोठा दिलासा! इराणकडून भारतासह 4 देशांच्या जहाजांना निर्बंधांतून सूट

मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध

US Midterm Election: मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष का पराभूत झाला? ही आहेत पाच कारणं

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स हे

US Midterm Election : मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका ! ट्रम्प म्हणाले, ‘मी मैदानात असतो तर...

US Midterm Election : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची धडक; एक भारतीय ठार

नेपाळच्या सोलुखुम्बु जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर उतरताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने एका भारतीय

Indian ship attacked in Oman sea : ओमानच्या समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हवाई हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १३ जण सुखरूप

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय व्यापारी जहाजावर अचानक हवाई हल्ला झाल्याची अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे.