Pitbull Attack : बाळाला कडेवर घेऊन बाहेर पडताच पिटबुलचा भयानक हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

सोनीपत : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात पाळीव पिटबुल कुत्र्याने 6 महिन्यांच्या बाळावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिक्का कॉलनी परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झालं असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या रोहतक येथील PGI रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला 6 महिन्यांच्या बाळाला घेऊन जात होती. त्याचवेळी पिटबुल कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे महिलेचा तोल गेला आणि ती बाळासह खाली पडली. यानंतर कुत्र्याने बाळाला पकडलं. बाळाला वाचवण्यासाठी महिलेने आरडाओरड करत मदत मागितली.


घटनेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. काही नागरिकांनी काठ्यांच्या मदतीने कुत्र्याला बाळापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याने बाळाला सोडले नाही. काही वेळाच्या प्रयत्नानंतर नागरिकांना बाळाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका करण्यात यश आलं.






घटनेचा व्हिडिओ व्हायरल 

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पिटबुल बाळावर हल्ला करताना दिसत असून महिला मदतीसाठी ओरडताना दिसते. नागरिक कुत्र्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.


दरम्यान, या घटनेनंतर कुत्र्याच्या मालकाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हल्ल्याच्या वेळी मालकाची प्रतिक्रिया काय होती, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर लहान मुलांच्या आसपास पाळीव कुत्रे ठेवताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे.


सहा महिन्यांच्या बाळावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बाळाची प्रकृती आणि या प्रकरणात प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Surinder koli suicide : २००६ च्या बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळीची आत्महत्या; हरिद्वारमधील चहाच्या टपरीवर गळफास

हरिद्वार : २००६ मधील नोएडा येथील बहुचर्चित आणि थरारक निठारी नरसंहार प्रकरणातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळी याने

Amazon India : इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढल्याने ग्राहकांची खरेदी मंदावली; सणासुदीपूर्वी 'ॲमेझॉन इंडिया'च्या विक्रीला फटका

मुंबई : सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच भारतीय इलेक्ट्रॉनिक्स बाजारावर वाढत्या किमतींचा परिणाम

Asian Games 2026 : एशियन गेम्समध्ये भारताचा डंका! मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर भूषवणार ध्वजधारकाचा मान

जपानमधील नागोया येथे होणाऱ्या 'आशियाई खेळ २०२६' च्या (Asian Games 2026) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजधारक म्हणून

Unique Foldable Bappa Idol : मुंबईच्या कलाकाराची कमाल! अमेरिकेतील बाप्पासाठी बनवली अनोखी 'फोल्डेबल' गणेशमूर्ती!

मूर्तिकार आशिष पाटकर यांनी साकारलेला 'न्यू जर्सीचा राजा' अमेरिकेत विराजमान मुंबई : सागरी सफरीचा महिनाभराचा

Darjeeling honeymoon accident : दार्जिलिंगमध्ये हनिमूनदरम्यान भीषण अपघात: होमस्टेमध्ये शेकोटी पेटवताना नववधू गंभीर भाजली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

दार्जिलिंग : दार्जिलिंगच्या सुंदर टेकड्यांमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या एका नवविवाहित दांपत्याच्या आनंदावर

Semicon India 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत 'सेमिकॉन इंडिया 2026' चे भव्य उद्घाटन; सेमीकंडक्टर अभियानाच्या १३.५ अब्ज डॉलरच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'सेमिकॉन इंडिया 2026' परिषदेचे दिमाखदार उद्घाटन