C P Radhakrishnan : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; देशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

मुंबई : मुंबईतील जगप्रसिद्ध 'लालबागचा राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) दरबारात गणेशोत्सवाच्या काळात देशभरातून व्हीआयपी आणि भाविकांचा ओघ सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात हजेरी लावून बाप्पाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस सुधीर साळवी, अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपराष्ट्रपतींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.



'लालबागचा राजा हा मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक' : उपराष्ट्रपती




दर्शन घेतल्यानंतर उपराष्ट्रपतींच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून (X - पूर्वीचे ट्विटर) या भेटीचे सुंदर फोटो पोस्ट करण्यात आले. उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात लिहिले की, "लालबागचा राजा हा केवळ गणेशोत्सव नाही, तर तो मुंबईचा महान सांस्कृतिक वारसा, भाविकांची अढळ श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे जिवंत प्रतीक आहे." यावेळी त्यांनी संपूर्ण देशात शांतता, आरोग्य आणि समृद्धी लाभावी यासाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली.



उपराष्ट्रपतींचा एकदिवसीय महाराष्ट्र दौरा


उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे एका दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात मुंबई, लोणावळा आणि पुणे येथील कार्यक्रमांचा समावेश आहे. सकाळी मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर ते दुपारी लोणावळ्याकडे रवाना झाले. तेथे 'कैवल्यधाम' संस्थेच्या 'गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस'च्या अमृत महोत्सवी (७५ व्या) वर्षाच्या सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली. यानंतर संध्याकाळी ते पुण्यात पोहोचणार असून, तेथे प्रसिद्ध ३८ व्या 'पुणे फेस्टिव्हल'चे भव्य उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.



केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह दिग्गजांची हजेरी


गणेशोत्सवाच्या या पवित्र काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या हस्ती हजेरी लावत आहेत. शुक्रवारी सकाळी उपराष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या कुटुंबासह राजाच्या चरणी माथा टेकवला. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.



९३ व्या वर्षात पदार्पण; भाविकांचा अलोट उत्साह


यंदा लालबागच्या राजा गणेशोत्सवाचे ९३ वे वर्ष आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उत्सवात दररोज लाखो भाविक तासंतास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेत आहेत. या १० दिवसांच्या सोहळ्याची सांगता २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या भव्य आणि नयनरम्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि

Deepika Padukone Ranveer Singh siddhivinayak : दुसऱ्या बाळाच्या स्वागतापूर्वी 'दीपवीर' सिद्धिविनायकाच्या चरणी; दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने कुटुंबासह घेतले बाप्पाचे आशीर्वाद

बॉलीवूडचे लाडके जोडपे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveeer Singh) लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाचे या जगात स्वागत

Pakistan Mosque Blast : पाकिस्तान हादरले ! नमाजावेळी मशिदीजवळ भीषण स्फोट; 16 जणांचा मृत्यू

Pakistan Mosque Blast : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारच्या नमाजावेळी भीषण स्फोट झाला.

Eknath Shinde : 'मी गावी आलो, दिल्लीत किंवा लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखीच'; दरे गावातून उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

सातारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या 'दरे' या मूळ गावी पोहोचलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी

ST Bus Accident : गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात! अनियंत्रित बस उलटून २०-२५ प्रवासी गंभीर जखमी

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवणी (Gadchiroli Bus Accident) नदीच्या पुलाजवळ एसटी बसचा एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला

Nasaka Sugar Factory News : नासाकाची देणी थकवणाऱ्या कंपनीला 4 दिवसांची मुदत, संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा इशारा

Nasaka Sugar Factory News : नाशिक सहकारी साखर कारखान्याशी (नासाका) संबंधित शेतकरी, कामगार आणि इतर देणीदारांची थकीत रक्कम न