Friday, September 18, 2026

Pune Accident : नवले पूल परिसरात पुन्हा भीषण थरार; ब्रेक फेल झालेल्या ३ ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

Pune Accident : नवले पूल परिसरात पुन्हा भीषण थरार; ब्रेक फेल झालेल्या ३ ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुणे : पुण्यातील अत्यंत धोकादायक आणि अपघातांचे केंद्र ठरलेल्या नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा अत्यंत भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे तीन मोठे ट्रक एकमेकांवर आदळले, ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Pune Accident)

नेमकी घटना कशी घडली?

प्राथमिक माहितीनुसार, एका मालवाहू ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले, ज्यामुळे तो भरधाव वेगात समोरील ट्रकला जाऊन धडकला. ही धडक इतकी तीव्र होती की, त्याच्या मागोमाग येणारे तीन ट्रक एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या भीषण मालिकेत ट्रकच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

कॅबिनमध्ये अडकला चालक; नागरिकांची मदतीसाठी धाव

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अपघाताची तीव्रता इतनी भयानक होती की, ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या धडकेत एक व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्येच आत अडकून पडली होती, ज्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून गाडी थांबवली आणि जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली.(Pune Accident)

वाहतूक ठप्प आणि प्रशासनाची कारवाई

या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. नवले पुलावरील वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >