Wednesday, November 4, 2026

शेतमाल 50 किलोच्या मर्यादेतच आणा, बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन; गमाल-मापाड्यांच्या मागण्यांवर निर्णय

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना भुसारमाल, भाजीपाला आणि कांदा विक्रीसाठी आणताना 50 किलो वजन मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. गोणी, कॅरेट किंवा पिशव्यांचे वजन 50 किलोच्या आत ठेवण्याचे निर्देश सभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिले आहेत. हमाल-मापाडी महामंडळाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरच्या भुसार, भाजीपाला आणि नेप्ती उपबाजार आवारातील कांदा विक्रीसाठी शेतमाल आणताना 50 किलो वजनाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नानासाहेब बोठे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. यापुढे भुसारमाल, भाजीपाला आणि कांदा विक्रीसाठी आणताना 50 किलो वजनाच्या आतील गोणी, कॅरेट किंवा पिशव्यांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाने राज्यभर 50 किलो वजनाच्या मर्यादेची अंमलबजावणी करण्यासह एकूण नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील बाजार समित्यांचे कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत कार्यालयाचे 3 नोव्हेंबर 2026 रोजीचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले आहे.

राज्याच्या पुणे येथील पणन संचालनालयातर्फेही 2 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निर्देशानुसार कांदा, बटाटा व अन्य शेतमालाची 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या नायलॉन (प्लास्टिक) पिशव्यांमधून चढ-उतार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या भुसार यार्डमध्ये भुसारमाल, भाजीपाला यार्डमध्ये भाजीपाला, तर नेप्ती उपबाजार आवारात कांदा विक्रीसाठी आणताना 50 किलोच्या आतील वजनाच्या गोणी, कॅरेट किंवा पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन सभापती बोठे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >