Nashik Crime : आठ महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून गायब, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नांदगाव तालुक्यातून आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मन्याड चौकी परिसरात 17 तारखेच्या मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असताना चिमुकली अचानक गायब झाली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



अंथरुणातून चिमुकली गायब


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास चिमुकली आई-वडिलांसोबत झोपली होती. मात्र, मध्यरात्रीनंतर ती अंथरुणातून गायब झाल्याचे सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. चिमुकलीच्या वडिलांनी नांदगाव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे.



पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिसांचे पथक चिमुकलीचा शोध घेत आहे. परिसरातील घरे, शेतजमीन, जंगलाचा भाग तसेच आसपासच्या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, अद्याप चिमुकलीचा ठोस माग लागलेला नाही. दरम्यान, चिमुकलीच्या कुटुंबीयांना एका व्यक्तीवर संशय असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या व्यक्तीने आरोपांनंतर स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेचा आणि चिमुकलीच्या बेपत्ता होण्याचा थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.



चिमुकली कुठे गेली ?


अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाचे मध्यरात्री घरातून गायब होणे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. चिमुकलीला कोणी घरातून नेले का, ती घराबाहेर कशी गेली किंवा या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, चिमुकलीबाबत कोणतीही संशयास्पद किंवा महत्त्वाची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. सध्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू असून, या प्रकरणातील सत्य तपासातूनच समोर येणार आहे.

Comments
Add Comment

"राहुल गांधी म्हणजे धूर निघालेलं रॉकेट"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Gold Silver Rate Hike : दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका ! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाला कोट्यवधींच्या खंडणीची धमकी! लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. टायगर श्रॉफ नंतर आता आणखी एका

इस्रायल निवडणूक आयोगाचा निर्वाळा: मतदानात गैरप्रकार नाही, नेतन्याहूंचा आरोप फेटाळला

इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही गैरप्रकार किंवा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताला मोठा दिलासा! इराणकडून भारतासह 4 देशांच्या जहाजांना निर्बंधांतून सूट

मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध

Bigg Boss 20: ‘मला पैसेसुद्धा नकोत!’ माही विजचा संताप, बिग बॉस २० मधून घेणार एक्झिट?

बिग बॉस २० या टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सध्या नातेसंबंध आणि एकमेकांबद्दलची वक्तव्ये या दोन्ही बाबतीत मोठा drama