Nashik Earthquake : नाशिकमध्ये 'या' ठिकाणी भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. डांगराळे, शिंदे, रोकडपाडा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना हे धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.



3.3 रिश्टर स्केलचा भूकंप


राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (National Seismological Center) नोंदीनुसार, 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 4 किलोमीटर खोलीवर असल्याचे नोंदवण्यात आले आहे. हे ठिकाण नाशिकपासून अंदाजे 53 किलोमीटर अंतरावर असून शिंदे आणि रोकडपाडा परिसराच्या जवळ असल्याचे सांगण्यात आले. (Nashik Earthquake News)



सुदैवाने कोणतीही हानी नाही


भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela CCTV : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये 5 हजार AI कॅमेऱ्यांचे जाळे, साधुग्राम, घाट आणि पार्किंगवर विशेष नजर

Nashik Kumbh Mela CCTV : 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा आणि

Nashik Crime : आठ महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून गायब, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नांदगाव तालुक्यातून आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मन्याड

Eknath Shinde : शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून सडेतोड प्रहार; 'लंडनचे यश खुपते, म्हणून पोटात दुखते' म्हणत साधला निशाणा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एका खोचक

UPI transaction charges news : ₹२,००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क; मुंबईतील व्यापारी चिंतेत, ग्राहकांमध्ये नाराजी

मुंबई : युपीआय (UPI) पेमेंट प्रणालीबाबत समोर आलेल्या एका नव्या प्रस्तावामुळे मुंबईतील व्यापारी आणि सर्वसामान्य

Nashik : गणपती विसर्जनानंतर मोसम नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला, दोन 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Nashik : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा मोसम नदीच्या बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Ganeshotsav 2026 : "आम्ही पण मुंबईकर"! परळच्या चिटणीस कुटुंबाचा देखावा; समुद्री जीवांच्या संरक्षणासाठी गणेशोत्सवातून हाक

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी आणि गजबजलेले रस्ते! पण याच