Ahilyanagar News : पती आणि प्राथमिक शिक्षिकेतील कथित जवळकीच्या संशयातून संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळेत जाऊन शिक्षिकेला जाब विचारल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात घडल्याची माहिती आहे. शाळा सुरू असताना हा प्रकार घडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान प्राथमिक शाळेत घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
व्हॉट्सॲप चॅटिंग आणि भेटींमुळे पत्नीचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर परिसरातील एका तरुणाचे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेसोबत मागील वर्षभरापासून कथित जवळचे संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित तरुण स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत असल्याची माहिती आहे. शिक्षिकेला शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी तो वाहनाने नेवासा फाट्यापर्यंत जात असल्याचे तसेच दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हालचालींमुळे तरुणाच्या पत्नीला संशय आला. त्यानंतर तिने पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर पती आणि शिक्षिकेतील कथित संबंधाची माहिती समोर आल्यानंतर पत्नी संतप्त झाल्याचे सांगण्यात येते.
Chhatrapati Sambhajinagar Crime : सायबर ठगांनी फसवणुकीसाठी आता ओळखीच्या व्यक्तींच्या फोटोचाही गैरवापर सुरू केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा ...
शाळेच्या आवारात पत्नीचा संताप
यानंतर संतप्त पत्नी थेट संबंधित शाळेत पोहोचली. वर्गाबाहेर शिक्षिका दिसताच तिने तिच्याशी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी दोघींमध्ये वाद झाला आणि पत्नीने शिक्षिकेचे केस पकडल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेच्या आवारात गोंधळ उडाला. परिसरात नागरिक जमा होऊ लागल्यानंतर संबंधित शिक्षिका तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रामस्थांकडून शिक्षिकेवर कारवाईची मागणी
शाळेच्या परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित शिक्षिकेच्या कथित वर्तनाबाबत चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित शिक्षिका, शाळा प्रशासन किंवा इतर संबंधितांची बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.






