मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी आणि गजबजलेले रस्ते! पण याच धावपळीच्या मुंबईच्या किनाऱ्यांवर एक ...
ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस धावतात. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता रविवारी (२० सप्टेंबर) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग वळवण्यात येणार असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीमध्ये डाऊन दिशेच्या लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे उपनगरीय रेल्वे नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २०.०९.२०२६ रोजी ठाणे आणि कल्याण दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी सकाळी ०९.०० ते दुपारी १.०० या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये काही गाड्यांच्या वेळेत बदल, शॉर्ट… pic.twitter.com/5XO1EeHTro
— Central Railway (@Central_Railway) September 19, 2026
11029 मुंबई सीएसएमटी- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्सप्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्सप्रेस, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकल ठाणे- कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. 22226 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस, 12126 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस, 12134 मंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 13201 राजगीर- लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस, 17221 काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस, 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल, 12812 हतिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17611 नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस आणि 22160 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस या सर्व 'अप' दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान 'अप' जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरीय गाड्या आपल्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.
मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा शुक्रवारी (१८ सप्टेंबर) ...
मेमू लोकल सेवा सुद्धा बंद असणार आहे. काही मेमू लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. वसई रोड स्थानकावरून सकाळी ९.५० वाजता सुटणारी वसई रोड- दिवा मेमू रेल्वे कोपर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे. तर, दिवा स्थानकावरून सकाळी ११.३० वाजता सुटणारी दिवा- वसई रोड मेमू रेल्वे कोपर स्थानकावरून सकाळी ११.४५ सोडण्यात येणार आहे. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान मेमू सेवा रद्द करण्यात आली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट रेल्वे मार्गावर कोणताही 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेवरील मुंबई सीएसएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान, हार्बर लाईनवरील मुंबई सीएसएमटी ते पनवेल विभाग (ज्यामध्ये ट्रान्स-हार्बर लाईन आणि बेलापूर-उरण पोर्ट लाईनचाही समावेश आहे) आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार- डहाणू रोड या मार्गिकेवर कोणताही 'मेगाब्लॉक' घेतला जाणार नाही.