Ashish Shelar : काळाचौकी दुर्घटनेनंतर मंत्री आशिष शेलारांनी घेतली मृतांच्या कुटुंबीयांची भेट; गणेश मंडळांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई : काळाचौकी महागणपती मंडळाच्या परिसरात घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेनंतर सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केईएम रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ वर्षीय रागिणी घनश्याम यादव हिच्या वडिलांची तसेच ३३ वर्षीय सुजाता यांच्या पतीची भेट घेऊन त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. (Ashish Shelar)


सुजाता यांचा मृतदेह त्यांच्या पतीला मूळ गावी घेऊन जाता यावा, यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले.


या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, घटनेशी संबंधित पुरावे संकलित करून त्याआधारे पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. दुर्घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. (Ashish Shelar)




गणेश मंडळांना सुरक्षेबाबत आवाहन


गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. मात्र, उत्सवाच्या काळात भाविक आणि नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याची असली पाहिजे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. (Ashish Shelar)


प्रत्येक गणेश मंडळाने मंडप परिसरातील सुरक्षिततेचे नियम तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. गर्दीचे व्यवस्थापन, मंडप परिसरातील सुरक्षितता आणि भाविकांच्या ये-जा व्यवस्थेकडे मंडळांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Ashish Shelar)


यासंदर्भात मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनालाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सवाचा आनंद आणि भक्तीची परंपरा कायम ठेवतानाच सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व द्यावे, अशी विनंती त्यांनी मुंबईतील सर्व गणेश मंडळांना केली. (Ashish Shelar)




मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासकीय मदतीच्या सूचना


या दुर्दैवी दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. संबंधित कुटुंबीयांना आवश्यक ती प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनेनंतर घटनास्थळी वीजपुरवठा बंद करून परिसर सुरक्षित करण्यात आला होता. तात्पुरत्या विद्युत व्यवस्थेशी संबंधित बाबींचीही तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Ashish Shelar)


Comments
Add Comment

Mumbai Kalachowki Electrocution : काळाचौकी प्रकरणातील स्टॉल चालकावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील काळाचौकी परिसरात गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

Mumbai local Train : गणेश विसर्जनासाठी मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; 84 लोकलचा थांबा रद्द

मुंबई : गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी

Jogeshwari Ganeshotsav tragedy : मुंबईत गणेश विसर्जनाला गालबोट; जोगेश्वरीत विजेचा धक्का लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या धक्क्याच्या घटना घडल्या आहेत.

BMC : माय गे (मुंबई) तू चाल पुढे….

सचिन धानजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आश्विनी भिडे या जेव्हा विराजमान झाल्या तेव्हा, पहिल्या महिला आयुक्त

Deendayal Antyodaya Yojana : महिला बचत गटांना आता २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत स्थापित गटांना मिळणार लाभ मुंबई (विशेष

Malabar Hill : मलबारहिल टेकडीवर नवीन ५२ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलाशय

प्रकल्प सल्लागाराचा प्रस्तावाची पुन्हा तपासणीसाठी आयआयटी रुरकीची घेतली मदत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मलबार