Indian Air Force : भारत-जपान हवाई दलांचा ‘वीर गार्डियन-2026’ सराव; दोन्ही हवाई दल प्रमुख एकत्र उडणार तेजस

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर हवाई तळावर भारत आणि जपानच्या हवाई दलांमध्ये ‘वीर गार्डियन-2026’ हा संयुक्त सराव सुरू आहे. रविवारी या सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि जपानच्या हवाई दलाचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी जोधपूर हवाई तळाला भेट दिली.



दोन्ही अधिकाऱ्यांनी सरावात सहभागी झालेल्या भारतीय आणि जपानी हवाई दलाच्या जवानांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या पथकांसोबत त्यांनी समूह छायाचित्रही काढले. त्यानंतर दोन्ही हवाई दल प्रमुख संयुक्तपणे उड्डाण करणार आहेत. या उड्डाणाकडे भारत आणि जपानमधील संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.


या संयुक्त उड्डाणात भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग हे स्वदेशी तेजस लढाऊ विमानाचे नेतृत्व करणार आहेत. तर जपानचे हवाई दल प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता हे तेजसच्या प्रशिक्षक विमानातून उड्डाण करतील. त्यांच्या विमानाचे नियंत्रण भारतीय वैमानिकाकडे असेल.






‘वीर गार्डियन-2026’ हा 14 दिवसांचा सराव असून तो 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सरावात भारताकडून तेजस, राफेल आणि सुखोई-30MKI या लढाऊ विमानांचा सहभाग आहे. तर जपानकडून F-2A विमानांचा सहभाग आहे. दोन्ही देशांचे हवाई दल विविध हवाई मोहिमांचा सराव करत आहेत.


या सरावाचा उद्देश केवळ हवाई कसरती करणे एवढाच नाही. मोहिमांचे नियोजन, त्यांची अंमलबजावणी आणि हवाई डावपेच याबाबत दोन्ही देशांचे वैमानिक आणि तज्ज्ञ एकमेकांसोबत अनुभवांची देवाणघेवाण करत आहेत. विमान अभियांत्रिकी आणि हवाई सुरक्षेसारख्या विषयांवरही चर्चा होत आहे.


या संयुक्त सरावामुळे भारत आणि जपानच्या हवाई दलांमध्ये समन्वय वाढण्यास तसेच एकत्रितपणे काम करण्याची क्षमता मजबूत होण्यास मदत होणार आहे.


Comments
Add Comment

फास्ट ट्रॅक न्यायालयांचा मोठा विस्तार! देशात 850 विशेष न्यायालये उभारण्यास केंद्राची मंजुरी; 5 वर्षांची मुदतवाढ

नवी दिल्ली: देशभरात बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार (पॉस्को) प्रकरणांना चाप लावण्यासाठी आणि खटल्यांची

हिमालयात साकारतेय औषधी वनस्पतींचं विश्व! हर्बल कुंभ 2026 चा भव्य शुभारंभ; धन्वंतरि धाम बनणार जागतिक आयुर्वेद केंद्र

[caption id="attachment_1072223" align="aligncenter" width="800"] उत्तराखंडच्या हिमालयीन परिसरात हर्बल कुंभ, जडी-बुटी कृषी मेळा आणि धन्वंतरि महोत्सव 2026

"राहुल गांधी म्हणजे धूर निघालेलं रॉकेट"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

ईडीचा दणका! केरळ ते तामिळनाडू 11 ठिकाणी धाडी, 'आप' आमदाराच्या घरीही झाडाझडती

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणाविरोधात आक्रमक पावले उचलत

Ramdas Athawale: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

केंद्र सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय

हरियाणात सरकारी नोकरीचे नियम बदलले; आता फक्त भारतीय नागरिकांनाच मिळणार प्राधान्य!

चंदीगड: हरियाणा सरकारकडून सरकारी नोकरीच्या पात्रतेसंदर्भात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.