मुंबई : गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटी परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लोकल वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असून या दिवशी गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ( Mumbai local)
गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी 6 ते रात्री 11.30 या वेळेत चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या 84 धीम्या लोकल चर्नी रोड स्थानकावर थांबणार नाहीत. या लोकल चर्नी रोडच्या फलाट क्रमांक 2 वर थांबणार नसल्याने फलाटावर होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
याशिवाय सायंकाळी 5 ते रात्री 8.30 या कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या 37 जलद लोकल धीम्या लोकलप्रमाणे चालवल्या जाणार आहेत. या लोकलना चर्नी रोडसह मार्गातील सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचे वयाच्या 46 व्या वर्षी अचानक निधन झाले. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या ...
रेल्वे प्रशासनाने 12 डब्यांच्या लोकलना चर्नी रोडसह सर्व स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 15 डब्यांच्या लोकलना ग्रँड रोड, चर्नी रोड आणि मरिन लाईन्स या स्थानकांवर थांबा दिला जाणार नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचे विभाजन करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने मध्यरात्री 12.15, 12.30, 1.10, 1.30, 2 आणि 3 वाजता सहा विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी मुंबईत येणाऱ्या भाविकांना रात्रीच्या प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे.