दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत स्थापित गटांना मिळणार लाभ
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य व केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना आता तब्बल २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्वयंसहाय्यता गटांना प्रति सदस्य १ हजार रुपयांप्रमाणे प्रति गट १०,००० रुपये खेळते भांडवल देण्यात येत होते,त्यात आता वाढ करून दिली जाणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व राज्य शासन पुरस्कृत राज्य नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या धोरणानुसार केंद्र शासन पुरस्कृत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही राज्यात ०१. एप्रिल २०१४ पासून संपुष्टात आली असून, त्याऐवजी राज्यातील ५३ शहरी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.
केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान शहरी गरीबांचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने १० ते २० महिला किंवा पुरुष एकत्र येऊन स्थापन करतील, मात्र त्या गटाचे ७० टक्के सदस्य दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे व उर्वरित ३० टक्के सदस्य अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक, विकलांग, स्त्रिया या प्रवर्गातून घेण्यात यावे. शहरामध्ये ज्या भागामध्ये नागरी दारिद्रय रेषेखालील नागरिकांची संख्या जास्त आहे, त्या भागामध्ये प्राधान्याने गट स्थापन करण्यात येतील. अशा घटकांमधून स्थापन करण्यात येणा-या स्वयंसहाय्यता गटांना प्रति सदस्य १,००० रुपये प्रमाणे प्रति गट १०,००० रुपये खेळते भांडवल देण्यात येते.
मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत महिला वचत गटांची स्थापना सन २०१२-१३ पासून करण्यात येत आहे. या महिला बचत गटाचे निकष / पात्रता हे पिवळे व केशरी शिधापत्रिका म्हणजेच १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न हे आहेत. तत्कालीन सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची संख्या तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची यादी परिपूर्ण नसल्याने लाभार्थ्यांना लाभ देणे अडचणीचे होत होते. जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत बचत गटांना स्थापन झाल्याच्या तीन महिन्यानंतर प्रति सदस्य २,००० रुपये किंवा प्रति गट जास्तीत जास्त २५,००० रुपये खेळते भांडवल देण्यात येत आहे.
मागील दोन वर्षापासुन अभियानांतर्गत निधी प्राप्त होत नसल्यामुळे बचत गटान भांडवल वितरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जेंडर महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत तरतुदीमधन एकूण १२५ बचत गटांनाच प्रति २,००० रुपये प्रमाणे प्रति गट जास्तीत जास्त २५,००० रुपये इतके अतिरिक्त खेळते भांडवल वितरित करण्यात आलेले आहे. अशा बचत गटांना जेंडर वजेटच्या महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत प्रति गट जास्तीत जास्त २५,००० रुपये एवढे खेळते भांडवल वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियान अंतर्गत स्थापित झालेल्या एकूण किमान २५०० बचत गटांना, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जेंडर बजेटच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत खेळते भांडवल वितरित करण्याकरीता एकूण ५.५० कोटी रुपये एवढ्या निधीची आवश्यकता आहे. यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.






