Riteish Deshmukh : रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी घेतले 'लालबागच्या राजा'चे दर्शन!

जांभळ्या रंगाच्या पारंपरिक पेहरावात जिनिलियाचा साधेपणा ठरला खास


मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाची भव्यता आणि उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत असून, बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या (Lalbuagcha Raja) दरबारात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. याच उत्साहात बॉलिवूडची आवडती जोडी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी 'लालबागच्या राजा'च्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. अथांग जनसागराच्या आणि गर्दीच्या गराड्यातही या दांपत्याने अत्यंत श्रद्धेने आणि अनवाणी पायांनी चालत जाऊन राजाचे दर्शन घेतले.





दर्शनासाठी जातानाचा या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात भक्तांची अलोट गर्दी असताना, पोलीस बंदोबस्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेत रितेश आणि जिनिलिया यांनी बाप्पाच्या मुख्य मूर्तीकडे प्रस्थान केले. यावेळी जिनिलियाच्या हातात बाप्पाला अर्पण करण्यासाठी नारळ दिसून आले. अत्यंत भावूक आणि भक्तिमय वातावरणात या दोघांनी राजाच्या चरणी माथा टेकवून प्रार्थना केली. यंदाच्या २०२६ च्या गणेशोत्सवात रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, रोहित शर्मा आणि अंबाणी कुटुंबापाठोपाठ आता देशमुख दांपत्यानेही हजेरी लावून लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.


या विशेष प्रसंगी दोघांचाही पारंपरिक आणि साधेपणाने मढलेला अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला. जिनिलियाने गडद जांभळ्या (पर्पल) रंगाचा सुंदर अनारकली कुर्ता, मॅचिंग पायजमा आणि ओढणी परिधान केली होती, ज्यावर अतिशय नाजूक फुलांची नक्षीकाम केलेली होती. या पारंपरिक लूकवर तिने ऑक्सिडाइज्ड चांदीचे मोठे झुमके, कपाळावर छोटी टिकली आणि मोकळे केस ठेवून अत्यंत देखणा लूक केला होता. तर दुसरीकडे, रितेश देशमुखने पांढऱ्या रंगाचा कुर्तात-पायजमा परिधान केला होता, ज्यावर हलकी पिवळ्या रंगाची भरतकाम केली होती. दोघांचाही हा सणाच्या वातावरणाला साजेसा पारंपरिक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.


मुंबईचा गणेशोत्सव आणि 'लालबागचा राजा' यांचे एक अनोखे नाते आहे. १९३४ मध्ये कोळी बांधवांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक मंडळाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. २०२६ च्या या उत्सवासाठी लालबागच्या राजाच्या देखाव्याची संकल्पना 'महादेव' (भगवान शिव) यांच्यावर आधारित ठेवली आहे. मंडपाच्या केंद्रस्थानी भव्य आणि आकर्षक त्रिशूळ उभारण्यात आले असून, मंदिरासारखी भव्य प्रवेशद्वारे आणि नयनरम्य रोषणाईमुळे यंदाचा देखावा अत्यंत प्रेक्षणीय आणि भव्यदिव्य दिसत आहे.

Comments
Add Comment

Train Safety System : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात 'कवच ४.०' सुरक्षा ऑडिट चाचणी यशस्वी; रेल्वे सुरक्षेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

सोलापूर : मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षेच्या आधुनिकीकरणात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर विभागाने

Mumbai News: मुंबईतील बंद कबुतरखाने तात्काळ उघडा, जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा अल्टीमेटम

मुंबई: मुंबईतील बंद करण्यात आलेले सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा; लोहगडावर दरीत ढकलताना पाहणारे 'ते' 3 प्रत्यक्षदर्शी समोर!

पुणे :  केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या

Nashik News : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वाॅच ! महामार्ग सुरक्षेसाठी मोठा निर्णय; 1,101 कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ

Nashik News : राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांना आळा

Nashik Crime News : ओमनी व्हॅनमधील 'त्या' मृतदेहाची ओळख पटली, मृत्यूचे कारण...

Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा इंडोनेशियावर १७-१ असा दणदणीत विजय

नागोया: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपले वर्चस्व कायम राखत आणखी एका धमाकेदार