अभिषेक बच्चनच्या स्वामित्व असलेल्या युरोपियन T20 प्रीमियर लीग (ETPL) मध्ये एडिनबर्ग कॅसल रॉकर्स संघाने इतिहास रचला आहे. एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने अंतिम सामन्यात बेलफास्ट वुल्व्ह्सचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव करत ETPL चे पहिलेवहिला विजेतेपद (ट्रॉफी) आपल्या नावावर केले आहे. या विजयाचा खरा नायक अँड्रीज गॉस ठरला, ज्याने नाबाद 90 धावांची मॅच-विनिंग खेळी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.(Abhishek Bachchan ETPL)
असा रंगला अंतिम सामना
सामन्यात एडिनबर्ग कॅसल रॉकर्सचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी अगदी अचूक ठरवला. ट्रेंट बोल्टने पॉल स्टर्लिंगला अवघ्या ८ धावांवर बाद करत बेलफास्टला सुरुवातीलाच धक्के दिले. डेव्हॉन कॉनवेने (29 धावा) डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र जेजे स्मट्स आणि मार्क वॅट यांच्या अचूक गोलंदाजीमुळे बेलफास्टच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भारतीय नागरिक होण्याआधीच त्यांच नाव मतदार यादीत असल्याने अडचणीत येण्याची शक्यता ...
बेलफास्टच्या संघाने निर्धारित षटकांत ५ विकेट्स गमावून १५० धावा केल्या. एडिनबर्गकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक २ विकेट्स घेत किफायतशीर गोलंदाजी केली.
अँड्रीज गॉसची नाबाद ९० धावांची जिगरबाज खेळी
१५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एडिनबर्गची सुरुवात आक्रमक झाली. रॉस अडायरने (23 धावा) आणि जेजे स्मट्सने (15 धावा) संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, एका बाजूने विकेट्स जात असताना अँड्रीज गॉसने अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळ करत 61 चेंडूंमध्ये नाबाद 90 धावांची (8 चौकार आणि 4 षटकार) शानदार खेळी केली. त्याला ब्रँडन मॅकमुलनने 17 धावा करून उत्तम साथ दिली. शेवटी कर्णधार मिचेल सँटनरसोबत मिळून गॉसने 18.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.(Abhishek Bachchan ETPL)
दिग्गजांची प्रतिक्रिया आणि संघाचे यश
सामना जिंकल्यानंतर बोलताना सामनावीर अँड्रीज गॉस म्हणाला की, "अंतिम सामने जिंकणे नेहमीच अप्रतिम असते. मी स्वतःसाठी 'शेवटपर्यंत टिकून राहणारा खेळाडू' बनण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि माझा हा दृष्टिकोन आज यशस्वी ठरला."
सोमवारी मिरज येथील शासकीय रुग्णालय परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका नवीन कमानीचे काम सुरू असताना अचानक ...
संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस आणि सह-मालक काइल मिल्स यांनी संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेला संघभाव, उत्कृष्ट संस्कृती आणि स्थानिक खेळाडूंच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्टार्स आणि स्थानिक प्रतिभेच्या अचूक समतोलामुळे एडिनबर्ग कॅसल रॉकर्स ही स्पर्धा गाजवत ETPL ची पहिली चॅम्पियन ठरली आहे.(Abhishek Bachchan ETPL)