Nashik Crime News : ओमनी व्हॅनमधील 'त्या' मृतदेहाची ओळख पटली, मृत्यूचे कारण...

Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. मात्र, आता पोलिस तपासातून मृताची ओळख समोर आली आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटली


ओमनीमध्ये आढळलेला मृतदेह शुभम बाळू पवार (वय 41) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांना हा मृतदेह ओमनीच्या मागील दोन सीटमधील मोकळ्या जागेत आढळून आला. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले असून, वाहनाच्या आतपासून रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ आढळले.


नागरिकांना संशय आल्यानंतर पोलिसांना माहिती


मालेगाव स्टॅण्ड परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एमएच 15 जीआर 8974 क्रमांकाची ही मारुती ओमनी मोहन भैरू भगत, रा. तळेगाव, महिरावणी यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. ही व्हॅन मालेगाव स्टॅण्ड परिसरात मागील तीन दिवसांपासून उभी असल्याची प्राथमिक माहिती आहे. परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिक आणि भाविकांची वर्दळ असतानाही हा प्रकार उशिराने समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मृत्यू नेमका कसा झाला ?


शुभम पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत कशी झाली? त्यांचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला? ते या वाहनात कसे आले? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासातून मृत्यूचं नेमकं कारण आणि घटनेची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पंचवटी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Pravin Darekar : भाजप गटनेते प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारचा अपघात

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका कारला मुंबईतील फ्रीवेवर सोमवारी

Train Safety System : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात 'कवच ४.०' सुरक्षा ऑडिट चाचणी यशस्वी; रेल्वे सुरक्षेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

सोलापूर : मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षेच्या आधुनिकीकरणात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर विभागाने

Mumbai News: मुंबईतील बंद कबुतरखाने तात्काळ उघडा, जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा अल्टीमेटम

मुंबई: मुंबईतील बंद करण्यात आलेले सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा; लोहगडावर दरीत ढकलताना पाहणारे 'ते' 3 प्रत्यक्षदर्शी समोर!

पुणे :  केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या

Nashik News : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वाॅच ! महामार्ग सुरक्षेसाठी मोठा निर्णय; 1,101 कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ

Nashik News : राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांना आळा

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा इंडोनेशियावर १७-१ असा दणदणीत विजय

नागोया: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपले वर्चस्व कायम राखत आणखी एका धमाकेदार