Monday, September 21, 2026

Deepika Padukone On Family Planning: रणवीर- दीपिका तिसऱ्या बाळाचंही प्लॅनिंग करतायत का? दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीची जुनी प्रतिक्रिया चर्चेत

Deepika Padukone On Family Planning: रणवीर- दीपिका तिसऱ्या बाळाचंही प्लॅनिंग करतायत का? दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीची जुनी प्रतिक्रिया चर्चेत
मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल दीपिका आणि रणवीर दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. 19 सप्टेंबर 2026 रोजी अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या दोघांनाही पहिली दुआ नावाची एक मुलगी सुद्धा आहे. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सध्या दीपिकाची जुनी प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तिने 2013 मध्ये दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये फॅमिली प्लॅनिंगबद्दल महत्त्वाचं विधान केलं होतं. तिचं हे जुनं विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिने जुन्या मुलाखतीमध्ये केलेलं फॅमिली प्लॅनिंग सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
2013 साली राजीव मसंद यांच्यासोबत एका राऊंडटेबल चर्चा सत्रामध्ये दीपिका सहभागी झाली होती. चर्चासत्रामध्ये राजीव यांनी दीपिकाला "जर तू अभिनय क्षेत्रामध्ये काम केलं नसतं? तर तू कोणत्या क्षेत्रामध्ये करियर केलं असतं?" या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वत्र चर्चेचं विषय ठरली आहे. ती म्हणाली की, "जर मी अभिनय क्षेत्रामध्ये नसते, तर मला माहित नाही मी काय काम करू शकले असते. पण मला आशा आहे की, माझ्या आजुबाजुला माझे मुलं असतील, माझे तीन मुलं इकडे तिकडे धावत असतील. मी अशी आशा करते की, माझ्याजवळ इतकं काम असावं की, त्यांना मी माझ्या शुटिंगच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकली असती. माझी इच्छा आहे की आमचं एक आनंदी कुटुंब असावं. जे मी पूर्वी काम करत होते, तेच काम आत्ताही करत असते."  
 
View this post on Instagram
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

याशिवाय, रणवीरने सुद्धा फॅमिली प्लॅनिंगबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने लग्नानंतरच फॅमिली प्लॅनिंगविषयी स्वत:चं मत दिलेलं होतं. एका मुलाखतीमध्ये रणवीरला फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आलं होतं. "याबद्दल दीपिकाचे मत ग्राह्य धरले जाईल, त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल. खरं तर, फॅमिली प्लॅनिंगचा निर्णय आमच्या दोघांचाही आहे. पण मुख्यत: तो तिचाच निर्णय असेल. बऱ्याचदा मी तिलाच निर्णय घेण्याची संधी देतो, कारण की ती प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यामध्ये सरस आहे. त्यामुळे मी तिला हा महत्त्वाचा निर्णय घेऊ देतो. इतकंच नाही तर, ती माझ्यापेक्षा खूप जास्त समजूतदार आणि परिपक्व व्यक्ती आहे, हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही." अशी अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, दीपिकाने दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर ही प्रतिक्रिया कमालीची चर्चेत आली आहे.
दरम्यान, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी सप्टेंबर 2024 मध्ये पहिल्या मुलगीचं स्वागत केलं होतं. तिचं नाव त्यांनी दुआ ठेवलं आहे. दुआच्या जन्माच्या दोन वर्षांनंतर अर्थात 19 सप्टेंबर रोजी या जोडप्याला दुसऱ्यांदा मुलगी झाली. दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्यानंतर रणवीर- दीपिकाचं कुटुंब आता चार जणांचं झालं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >