मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा रविवारी पत्नी रितिका सजदेह हिच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. रोहित आणि रितिका यांनी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी रोहितला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Lalbaugcha Raja)
रोहित शर्मा लालबागच्या माहिती मिळताच परिसरात चाहत्यांची गर्दी झाली. रोहित समोर येताच चाहत्यांनी ‘रोहित-रोहित’ असा जयघोष करत त्याचे स्वागत केले. सोशल मीडियावर या भेटीचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Rohit Sharma)
पहा व्हिडिओ
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान सुरू असलेल्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रक्रियेत सातव्या दिवशीही मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 21 ...
समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि रितिका सजदेह लालबागच्या राजाच्या मूर्तीसमोर प्रार्थना करताना दिसत आहेत. दर्शनानंतर रोहितने आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली आणि ती बाप्पासमोर ठेवलेल्या पेटीत टाकली. या क्षणाचाही व्हिडीओ समोर आला आहे. (Lalbaugcha Raja Video)
लालबागचा राजा हे मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटी येथे दर्शनासाठी येतात. यंदाही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
दरम्यान, रोहित शर्मा आगामी क्रिकेट मालिकांमुळेही चर्चेत आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित खेळणार असल्याने या मालिकेचीही उत्सुकता आहे. ( Ganeshotsav 2026)