Sunday, September 20, 2026

Maharashtra weather : सावध राहा! पुढील 2-3 दिवस प्रचंड महत्त्वाचे; पावसाबाबत हवामान विभागाचे मोठे अपडेट

Maharashtra weather : सावध राहा! पुढील 2-3 दिवस प्रचंड महत्त्वाचे; पावसाबाबत हवामान विभागाचे मोठे अपडेट

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 2 ते 3 दिवस विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. नाशिक आणि अहिल्यानगरला यलो अलर्ट देण्यात आला असून, येथे वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागांतही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. पुढील 2 दिवस या भागात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत विजांसह वादळी वारे आणि जोरदार पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पावसाचा शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >