Tuesday, September 22, 2026

72th National Film Award: कार्तिक आर्यन, यामी गौतम अन्...! 'मु. पो. बोंबिलवाडी' ठरला राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी! अशी आहे यादी

72th National Film Award: कार्तिक आर्यन, यामी गौतम अन्...! 'मु. पो. बोंबिलवाडी' ठरला राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी! अशी आहे यादी
मुंबई: संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीचं ज्या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष असतं, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 72 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कायमच नवी दिल्लीमध्ये होणारा हा कार्यक्रम यावर्षी मात्र गुजरातमध्ये पार पडला. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर यंदाचा '72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा' पार पडला. 22 सप्टेंबर रोजी, एकता नगर येथील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' जवळ हा चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. 2024 साली रिलीज झालेल्या चित्रपटांना यंदा विविध श्रेणींसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. यंदा कोणकोणत्या चित्रपटांना आणि सेलिब्रिटींना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, जाणून घेऊया...
चित्रपट क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च सन्मान असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सुद्धा यावेळी प्रदान करण्यात आला आहे. 2024 सालाच्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या पाच दशकाच्या सिनेकरियरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयाचे देशभरामध्ये लाखो चाहते आहेत. याच त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही दखल घेत अनंत नाग यांना 2024 सालाचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे. अनंत नाग यांचे भारतीय सिनेसृष्टीसाठी अमुल्य योगदान आहे.
 

कोणकोणत्या चित्रपटांना आणि कलाकारांना 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले?

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2024'ने सन्मानित करण्यात आले.
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रशांत दामलेंच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटाला मिळाला.
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजकुमार रावच्या 'श्रीकांत' चित्रपटाला मिळाला.
  • सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार धनुषच्या 'रायन' चित्रपटाला मिळाला.
  • तर, अभिनेता धनुषला 'कॅप्टन मिलर' चित्रपटासाठी 'विशेष उल्लेख श्रेणी'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, 'रजत कमळ' पुरस्काराने अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले.
  • 'महाराजा' चित्रपटासाठी दिग्दर्शक अनिल अरासू यांना सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
  • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनचा राष्ट्रीय पुरस्कार 'भुल भुलैया 3' साठी मानस चौधरीला पुरस्कार मिळाला.
  • मल्याळम सिनेसृष्टीमध्ये, दिग्गज अभिनेते माम्मुट्टी यांना 'ब्रह्मयुगम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
  • बॉलिवूडमध्ये, लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनला 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
  • लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम- धर हिला 'आर्टिकल 370' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • 'स्त्री 2' चित्रपटासाठी कोरिओग्राफर विजय गांगुलीला बेस्ट कॉरिओग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • 'मैदान' चित्रपटासाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्तम गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >