एकता नगर : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा (Yaami Gautam) अत्यंत सुरेख आणि पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला. 'आर्टिकल ...
चित्रपट क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च सन्मान असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सुद्धा यावेळी प्रदान करण्यात आला आहे. 2024 सालाच्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या पाच दशकाच्या सिनेकरियरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयाचे देशभरामध्ये लाखो चाहते आहेत. याच त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही दखल घेत अनंत नाग यांना 2024 सालाचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे. अनंत नाग यांचे भारतीय सिनेसृष्टीसाठी अमुल्य योगदान आहे.
मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला मातृशोक झाला आहे. अभिनेत्रीची आई कृष्णा मुखर्जी यांचं निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. आज ...
#WATCH | Kevadia, Gujarat: Actress Yami Gautam received her first National Film Award for Best Actress for the film ‘Article 370' at the 72nd National Film Awards Ceremony.
(Source: President of India/ social media) pic.twitter.com/7hwVi6XOTK
— ANI (@ANI) September 22, 2026
#WATCH | Kevadia, Gujarat: Actor Kartik Aaryan receives the National Film Award for Best Actor for the film 'Chandu Champion' at the 72nd National Film Awards Ceremony.
(Source: President of India/ social media) pic.twitter.com/MHiXmOCfoD
— ANI (@ANI) September 22, 2026
कोणकोणत्या चित्रपटांना आणि कलाकारांना 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले?
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2024'ने सन्मानित करण्यात आले.
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रशांत दामलेंच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटाला मिळाला.
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजकुमार रावच्या 'श्रीकांत' चित्रपटाला मिळाला.
- सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार धनुषच्या 'रायन' चित्रपटाला मिळाला.
- तर, अभिनेता धनुषला 'कॅप्टन मिलर' चित्रपटासाठी 'विशेष उल्लेख श्रेणी'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, 'रजत कमळ' पुरस्काराने अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले.
- 'महाराजा' चित्रपटासाठी दिग्दर्शक अनिल अरासू यांना सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनचा राष्ट्रीय पुरस्कार 'भुल भुलैया 3' साठी मानस चौधरीला पुरस्कार मिळाला.
- मल्याळम सिनेसृष्टीमध्ये, दिग्गज अभिनेते माम्मुट्टी यांना 'ब्रह्मयुगम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- बॉलिवूडमध्ये, लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनला 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम- धर हिला 'आर्टिकल 370' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- 'स्त्री 2' चित्रपटासाठी कोरिओग्राफर विजय गांगुलीला बेस्ट कॉरिओग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
- 'मैदान' चित्रपटासाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्तम गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.