Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; 75 व्या वर्षी कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला मातृशोक झाला आहे. अभिनेत्रीची आई कृष्णा मुखर्जी यांचं निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. आज (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त यशराज फिल्म्सकडून शेअर करण्यात आले असून मुखर्जी फॅमिलीच्या गोपनीयतेचा आदर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, अभिनेत्रीच्या अनेक फॅन पेजकडूनही कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाची माहिती शेअर करण्यात आली आहे. राणी मुखर्जीच्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.



नेमकं कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राणी मुखर्जीच्या सोशल मीडियावरील फॅनपेजवर अनेक चाहत्यांकडून आदरांजली वाहिली जात आहे. या दु:खद प्रसंगी मुखर्जी कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर राखण्याची विनंती करण्यात आली आहे. कुटुंबीयांकडून समोर आलेल्या निवेदनामध्ये लिहिले की, "आम्हाला हे वृत्त सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या मातोश्री कृष्णा मुखर्जी यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आज दुपारी (22 सप्टेंबर, मंगळवार) अखेरचा श्वास घेतला. या कठिण काळामध्ये तुमच्याकडून कुटुंबीयांना मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आहोत."



"या कठीण काळामध्ये मुखर्जी कुटुंबीयांकडून प्रायव्हसी राखण्याची विनंती केली आहे. कठीण प्रसंगी मिळालेल्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल कुटुंबीय मनापासून आभारी आहेत. या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी कृपया आमच्या खासगीपणाचा आदर करावा," असंही निवेदनात म्हटलं आहे. कृष्णा मुखर्जी यांच्या विषयी सांगायचे तर, त्या सुद्धा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत होत्या. त्यांनी जरीही कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलं नसलं तरीही त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांच्या गाण्यांमध्ये पार्श्वगायिकेचं काम केलं आहे. बंगाली सिनेसृष्टीशिवाय, इतर कोणत्याही इंडस्ट्रीसाठी त्यांनी काम केले नाही. 2017 साली राणीच्या वडिलांचं निधन झालं होतं, आता त्यानंतर 9 वर्षांनी तिच्या आईचं निधन झालं आहे.



दरम्यान, राणीचं तिच्या आईसोबतचं बाँडिंग खूप खास होतं. ती कायमच आईच्या अत्यंत जवळ होती. कृष्णा मुखर्जी यांनी राणीला तिच्या करियरसाठी विशेष मदत केली होती. राणीच्या कोणत्याही चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग असो, त्या कार्यक्रमासाठी कायमच उपस्थित राहायच्या.
Comments
Add Comment

Gauri Ingawale: अभिनेत्री गौरी इंगवलेच्या ग्लॅमरस लूकची चर्चा

[caption id="attachment_1072964" align="alignnone" width="800"] अभिनेत्री गौरी इंगवले हीचा दशमी हा चित्रपट 23ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला

Madhuri Dixit son mystery girl Diwali party: 'धकधक गर्ल'ची होणारी सुनबाई कोण? माधुरीच्या लेकासोबत दिवाळी पार्टीमध्ये झाली स्पॉट; पाहा Video

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा अभिनय आणि तिच्या

Shehzad Poonawalla: राइज अँड फॉल सीझन २ चा विजेता शहजाद पूनावाला; विनिंग रक्कम बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी दान

Rise and Fall Season 2 winner:  'एमएक्स ओरिजिनल राइज अँड फॉल सीझन 2' चा विजेता शहजाद पूनावाला ठरला आहे. 6 आठवड्यांच्या स्पर्धेनंतर

Nana Patekar Memories:  नाना पाटकरांच्या आठवणीत क्रांती रेडकर भावुक, म्हणाली इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'...

Nana Patekar Memories: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रांतीने 'मैत्रेया' (Maitreyaa)

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई!

रणबीर कपूरचा फेमस 'रामायण' चित्रपट अखेर 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या

Zee Marathi Diwali 2026 : लहानपणीची दिवाळी ते आजची दिवाळी… झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी!

Zee Marathi Diwali 2026: दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सगळीकडे रोषणाई, दिवे, आकाशकंदील यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे.