Atul Parchure Magazine Movie : आठवणींच्या रूपात 'अतुल परचुरे' पुन्हा भेटीला येणार; ‘मॅगझिन’ चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं २०२४ मध्ये कर्करोगाशी झुंज देताना निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी अतुल परचुरे यांचा शेवटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळं चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (Atul Parchure Magazine Movie)


‘मॅगझिन’ असं या चित्रपटाचं नाव असून, यात अतुल परचुरे यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि किशोर कदम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. शहरात वाढलेला एक तरुण आयुष्यात काहीतरी वेगळं घडावं, या शोधात आपल्या पूर्वजांच्या गावाकडे निघतो. या प्रवासात त्याला माणसं, नाती आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मिळते. (Atul Parchure Magazine Movie)



टीझरच्या माध्यमातून 'मॅगझिन' शहरापासून महाराष्ट्राच्या मातीतल्या जगापर्यंत आणि तिथून 'घर' या संकल्पनेला नव्याने समजून घेण्याच्या प्रवासाची ओळख करून देतो. घर म्हणजे केवळ चार भिंतींची जागा, की आपल्या माणसांशी, आठवणींशी आणि मुळांशी जोडलेली भावना? या प्रश्नाभोवती फिरणारा तरुण नायकाचा प्रवास टीझरमधून हळूहळू उलगडत जातो.


टीझरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यातील क्षण, तरुणाई, मैत्री, गावाकडचं जगणं आणि काही अनपेक्षित प्रसंगांची सांगड पाहायला मिळते. एका संवादातून समोर येणारा एक शब्द नायकाचं लक्ष वेधून घेतो आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता निर्माण करतो. मात्र या प्रवासात त्याला नेमकी कोणती माणसं भेटणार आहेत, गावाशी त्याचं नातं कसं बदलणार आहे आणि हा अनुभव त्याला स्वतःकडे नव्याने कसं पाहायला लावणार आहे, याची उत्तरं चित्रपटात मिळणार आहेत. (Atul Parchure Magazine Movie)



'मॅगझिन' हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच अनुभवण्याचा सिनेमॅटिक अनुभव देण्याचं आश्वासन देतो. चित्रपटाचं विश्व महाराष्ट्राच्या संस्कृतीशीही जोडलेलं आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीची झलक टीझरमध्ये दिसते. हे सण केवळ दृश्यात्मक भव्यतेपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि वेगवेगळ्या पिढ्यांना जोडणाऱ्या भावनेचा भाग बनतात. त्यामुळे या प्रसंगांचा नायकाच्या प्रवासाशी नेमका काय संबंध आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Atul Parchure Magazine Movie)


शुभम संजय शेवडे यांचा हा पहिला मराठी फीचर चित्रपट आहे. लॉस एंजेलिसमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलेल्या शेवडे यांना महाराष्ट्रातील दत्तवाड येथील अनुभवातून ‘मॅगझिन’ची प्रेरणा मिळाली. समकालीन Gen Z दृष्टिकोन, मराठी संस्कृतीशी असलेली नाळ आणि गावाकडे पाहण्याचा उबदार दृष्टिकोन यांची सांगड चित्रपटातून घालण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मॅगझिन हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Atul Parchure Magazine Movie)

Comments
Add Comment

72nd National Film Awards : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यामी गौतमचा जलवा; पारंपरिक काळ्या साडीत पती आदित्य धरसोबत लावली हजेरी

एकता नगर : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा (Yaami Gautam) अत्यंत सुरेख आणि

Jui Gadkari : जुई गडकरीचे फोटो मॉर्फ केले अन्...; अभिनेत्रीचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. मात्र, याचदरम्यान तिच्याबाबत

अभिमानास्पद! ॲटली कुमारच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, दिग्दर्शकाने केलं तरी काय?

मुंबई: टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमार यांचा आज (21 सप्टेंबर) वाढदिवस असतो. या खास दिवशी

National Film Awards 2026 : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी! अंतिम टप्प्यात तयारी, चित्रपटसृष्टीत उत्सुकता

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

"कांताराप्रमाणेच गोंधळही भारतीय लोकपरंपरेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवेल", भारताची Oscar मध्ये अधिकृत एंट्री ठरल्यानंतर अभिनेते किशोर कदम यांची प्रतिक्रिया

मुंबई: उत्तम अभिनेता आणि कवी म्हणून मराठी प्रेक्षकांमध्ये घर निर्माण करणारे अभिनेते किशोर कदम सध्या चर्चेत

Raghav Chadha post for Parineeti : 'परिणीती, मला तुझा अभिमान वाटतो!'; 'शक' वेब सीरिजच्या पदार्पणावर पती राघव चड्ढा यांची खास पोस्ट

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Pareeniti Chopra) 'शक: ट्रस्ट नो वन' (Shaque: Trust No One) या सायकोलॉजिकल थ्रिलर