मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर पदवीधर तसेच अमरावती आणि पुणे शिक्षक अशा पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
महापालिका सभागृहनेत्यांनीही कारवाईला स्थगिती देण्याची केली आयुक्तांकडे मागणी यापूर्वी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या कारवाईला केला होता ...
या निवडणुकीत पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, छत्रपती संभाजी नगर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक या मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांच्या नव्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधरचे अभिजीत वंजारी, अमरावती शिक्षकचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षकचे जयंत आसगावकर यांच्या जागांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांकडून मतदार नोंदणी आणि संघटनात्मक तयारी सुरू होती. शिक्षकांचे वेतन, जुनी पेन्शन योजना, कायम विनाअनुदानित शाळांचे प्रश्न तसेच पदवीधरांच्या रोजगाराचे प्रश्न हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
- मतदान : २३ ऑक्टोबर २०२६
- मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर २०२६
- मतदारसंघ : पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर पदवीधर, तसेच अमरावती आणि पुणे शिक्षक