FDA Action: भेसळखोरांचे धाबे दणाणले! FDAने केलेल्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त, पाच अस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुंबई, चंद्रपूर, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडक कारवाई करत भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त केला आहे. संशयास्पद, भेसळयुक्त, चुकीचे लेबल लावलेले आणि निकृष्ट दर्जाचे तूप, खवा, पेढा, गूळ, तेल, चहा पावडर, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांचा साठा जप्त करत सुमारे रु. 30.82 लाख किंमतीचा मुद्देमाल एफडीएकडून जप्त करण्यात आला आहे. सोबतच मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांमध्ये 18 आस्थापनांवर कारवाई करत साठा जप्त केला आहे. तर मुंबईतल्या 5 आस्थापनांची तपासणी करत त्यांचे परवानेही निलंबित केले आहेत.



सणासुदीचे दिवस लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न- औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष तपासणी आणि धडक कारवाईची मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध भागांतून निकृष्ट दर्जा, भेसळ, चुकीचे लेबलिंग आणि असुरक्षिततेच्या संशयावरून अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 10 हजार 836 किलोचा साठा जप्त केला आहे. या एकूण जप्त साठ्याची किंमत सुमारे 30 लाख 81 हजार 888 रूपये इतकी आहे. यामध्ये जप्त केलेल्या खवा, मावा, पेढा, तूप, तेल, बर्फी, चहा पावडर, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. मुंबईतील मालाडमध्ये लाखोंच्या किंमतीचे सुमारे ४,६४६ किलो भेसळयुक्त आणि चुकीचे लेवल लावलेले तूप आणि तेल जप्त केलेय. "पूजा तूप" नावाखाली दिशाभूल करणारे लेबल वापरले आढळले.



मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि नागपूर या विभागांमध्ये 18 आस्थापनांवर कारवाई करत साठा जप्त केला आहे. कमी दर्जाचा संशय, दिशाभूल करणारे लेबल, भेसळयुक्त पदार्थ, चुकीचे लेबल अशा कारणांवरून पदार्थ जप्त केले आहे. कारवाई करत एफडीएने लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. एफडीएकडून मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा, क्लब आणि बेकरीवर कारवाई करत त्यांचे परवानेही निलंबित केलेला आहे. मालाड पूर्व, वर्सोवा, महालक्ष्मी आणि वांद्रे पश्चिम या ठिकाणच्या आस्थापनांवर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहे. शिवाय काही अस्थापनांचे नोंदणी प्रमाणपत्रेही निलंबित केले आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात एफडीए प्रशासन कमीलीचे सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
Comments
Add Comment

Vishakha Raut : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; अपात्रता कायम

मुंबई : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत (Vishakha Raut) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर फटका बसला

मुंबई पोलिसांची वॉकी- टॉकी चोरणारा आरोपी गजाआड, 700 CCTV कॅमेऱ्यातून चोराचा घेतला शोध

मुंबई: मुंबई पोलिसांची वॉकी टॉकी घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला मुंबई

R. C. Chavan : कामकाज आणि पद्धतीवरून मतभेद, निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा महाराष्ट्र UCC समितीचा राजीनामा

मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) (Maharashtra government’s committee ) लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य

Mumbai Crime News : 'मारहाण करून जीव घेतला...' कुटुंबाचा संताप; RPFच्या ताब्यात असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

CSMT घटनेची आता थेट CID कडून चौकशी! मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

Pu La Deshpande Literature : पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार

- १० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता; सांस्कृतिक विभागाचा निर्णय मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला

Breaking : विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक पाच मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर