मुंबई पोलिसांची वॉकी- टॉकी चोरणारा आरोपी गजाआड, 700 CCTV कॅमेऱ्यातून चोराचा घेतला शोध

मुंबई: मुंबई पोलिसांची वॉकी टॉकी घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला मुंबई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने चोरलेली वॉकी टॉकी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. सतत वाजत असल्यामुळे त्याने ती वॉकी टॉकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे. मुंबई पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी केली जात असून त्याचा वॉकी- टॉकी चोरण्यामागील त्याचा हेतू काय होता? याची सुद्धा चौकशी केली जात आहे.



मुंबई पोलिसांची वॉकी- टॉकी चोरण्याचा प्रयत्न मुंबईतील अंधेरीमध्ये करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी टू टँक परिसरातील व्ही.पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बीट पोस्टवरून वॉकी-टॉकी चोरल्याप्रकरणी अंधेरीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. चोरीला गेलेले उपकरण जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटली असून त्याची चौकशी पोलिसांकडून सध्या सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख मोहम्मद नियाज उर्फ ​​फैजान म्हणून अशी पटली आहे. तो उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील रहिवासी आहे. तो मुंबईतील रेल्वे स्थानकांजवळ राहत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी टू टँक बीट पोस्टवर वॉकी-टॉकी चार्जिंगसाठी ठेवण्यात आला होता, तेव्हा ते चोरीला गेला. चोरीनंतर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात तपासाची चक्रे फिरवले.



आरोपीचा माग काढण्यासाठी, पोलिसांनी परिसरात लावलेल्या सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. पोलिसांनी आरोपीच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देत आरोपीचा शोध घेतला आणि वॉकी टॉकी चोरल्यानंतर तो कोणत्या मार्गाने जातो याकडे लक्ष देऊन त्याला अटक केली. अखेर मुंबई पोलिसांनी आरोपीला अंधेरी रेल्वे स्टेशनवर शोधून अटक केली. सतत वॉकी- टॉकी वाजत असल्यामुळे त्याने ती वैतागून घेतली असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. चोरीच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिक रोगी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीची आणखीन सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहितीही पोलिसांना दिलेली आहे. इतकच नाही तर, त्याच्यावर आणखीन किती आरोप आहेत? याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी चोरीला गेलेला वॉकी- टॉकी जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या हालचाली आणि तो अशाच प्रकारच्या इतर कोणत्याही घटनांमध्ये सामील होता का, हे निश्चित करण्यावरही तपास केंद्रित आहे.
Comments
Add Comment

Vishakha Raut : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; अपात्रता कायम

मुंबई : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत (Vishakha Raut) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर फटका बसला

R. C. Chavan : कामकाज आणि पद्धतीवरून मतभेद, निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा महाराष्ट्र UCC समितीचा राजीनामा

मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) (Maharashtra government’s committee ) लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य

Mumbai Crime News : 'मारहाण करून जीव घेतला...' कुटुंबाचा संताप; RPFच्या ताब्यात असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

CSMT घटनेची आता थेट CID कडून चौकशी! मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

Pu La Deshpande Literature : पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार

- १० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता; सांस्कृतिक विभागाचा निर्णय मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला

Breaking : विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक पाच मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर

Disha Salian Case : 'तो मोठा खुलासा करणारच होता अन्...' दिशा सालियन प्रकरणात सुशांतच्या भावाच्या दाव्याने खळबळ

मुंबई : मुंबईतील दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.