Delhi Crime : 'हम पुलिस है!..' असं सांगून अल्पवयीन मुलीला गाठलं अन्..., बिहारनंतर दिल्लीतील भयकंर घटना

दिल्ली :  दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरातून अल्पवयीन मुलीवर अत्यावर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीला आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राला काही जणांनी पार्कमध्ये अडवल्याचा आरोप आहे. आरोपींनी स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगत दोघांना धमकावले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Delhi Crime)



नेमकं काय घडलं?


21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरात ही घटना घडली. संबंधित मुलगी आपल्या मित्रासोबत कालकाजी मंदिरात गेली होती. दर्शन घेतल्यानंतर दोघेही मंदिराजवळील एका पार्कमध्ये वेळ घालवण्यासाठी गेले होते. याच ठिकाणी 25 ते 30 वयोगटातील तीन जण त्यांच्याजवळ आले.


या तिघांनी आपण पोलीस असल्याचे सांगून मुलगी आणि तिच्या मित्राला धमकावल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यापैकी एका व्यक्तीकडे चाकू आणि बंदूक असल्याचे सांगून धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीला एका बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.



घटनास्थळावरून आरोपी फरार


घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले. रात्री सुमारे 8.45 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्या जबाबाच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान एका संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताच्या पायाला गोळी लागली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह

कुलाब्यातील शासकीय कार्यक्रमातून खासदार मिलिंद देवरांना डावलले; आयुक्त अश्विनी भिडेंना खरमरीत पत्र!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतील लाभार्थ्यांच्या चावी

वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, टी20 संघाची धुरा सांभाळणार

[caption id="attachment_1073007" align="aligncenter" width="800"] सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या

SBI ची 904 कोटींची फसवणूक? किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेलविरोधात CBI चा FIR!

मुंबई: देशातील अग्रगण्य रिटेल समूहांपैकी एक असलेल्या 'फ्युचर रिटेल लिमिटेड'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पटकावला राष्ट्रीय पुरस्कार!

नवी दिल्ली : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने

Narak Chaturdashi 2026 : नरक चतुर्दशी नेमकी कधी 7 की 8 नोव्हेंबर? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय जाणून घ्या

Narak Chaturdashi 2026 : दिवाळीला (Diwali 2026) सुरुवात झाली आहे. सगळीकडे रोषणाई, दिवे, फटाक्यांची आतिषबाजी, फराळ यांची सगळीकडे रेलचेल