- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन
मुंबई : मुंबईसह महानगर प्रदेशातील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टर पुनर्विकासाला चालना देण्याचे सरकारचे धोरण असून, युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. एमएमआरमध्ये ३० लाख घरांचे नियोजन यापूर्वीही शिंदे यांनी जाहीर केले असून, त्यात मुंबईत १० लाख आणि एमएमआरच्या अन्य भागांत २० लाख घरांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Eknath Shinde)
नवी दिल्ली: भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध पुन्हा रुळावर येत असून, एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी डिसेंबर ...
सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरमुळे ठाण्यातील सुमारे सहा हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरे मिळणार आहेत. निवासी इमारती उभारण्याबरोबरच २३ प्रकारच्या नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून ‘नवे ठाणे’ साकारण्याचे नियोजन असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ठाणे क्लस्टर योजनेत मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांचा एकत्रित पुनर्विकास करण्याची संकल्पना आहे. (Eknath Shinde)
या प्रकल्पात रुंद रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योग केंद्र, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा विकास केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी भूषवलेल्या घटनात्मक पदाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे मुंबई ...
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नाचा संदर्भ देताना शिंदे यांनी क्लस्टर योजनेचा प्रवास सुमारे २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आल्याचे नमूद केले. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह विविध दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषणे, मोर्चे आणि विधानसभेत आवाज उठविला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर योजना प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी सांगितले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने क्लस्टर विकासासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन केली असून, ५० नागरी पुनरुत्थान आराखड्यांपैकी १२ आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. (Eknath Shinde)
‘वॉक टू वर्क’ संकल्पना
- क्लस्टरमध्ये निवासी बांधकामासोबत व्यावसायिक विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवरही भर देण्यात येणार आहे. ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून घराजवळच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर तलावाचा पुनर्विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरण करून तलावाला मोकळा श्वास मिळवून देण्याचेही त्यांनी सांगितले. - रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले. विकासकांनी नफा कमी झाला तरी चालेल, मात्र घरांच्या दर्जात तडजोड करू नये, अशी सूचना त्यांनी केली. सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (Eknath Shinde)






