Eknath Shinde : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ वर्षांत ३० लाख घरे बांधणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन


मुंबई : मुंबईसह महानगर प्रदेशातील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टर पुनर्विकासाला चालना देण्याचे सरकारचे धोरण असून, युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. एमएमआरमध्ये ३० लाख घरांचे नियोजन यापूर्वीही शिंदे यांनी जाहीर केले असून, त्यात मुंबईत १० लाख आणि एमएमआरच्या अन्य भागांत २० लाख घरांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Eknath Shinde)



सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरमुळे ठाण्यातील सुमारे सहा हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरे मिळणार आहेत. निवासी इमारती उभारण्याबरोबरच २३ प्रकारच्या नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून ‘नवे ठाणे’ साकारण्याचे नियोजन असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ठाणे क्लस्टर योजनेत मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांचा एकत्रित पुनर्विकास करण्याची संकल्पना आहे. (Eknath Shinde)


या प्रकल्पात रुंद रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योग केंद्र, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा विकास केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.



ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नाचा संदर्भ देताना शिंदे यांनी क्लस्टर योजनेचा प्रवास सुमारे २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आल्याचे नमूद केले. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह विविध दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषणे, मोर्चे आणि विधानसभेत आवाज उठविला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर योजना प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी सांगितले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने क्लस्टर विकासासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन केली असून, ५० नागरी पुनरुत्थान आराखड्यांपैकी १२ आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. (Eknath Shinde)



‘वॉक टू वर्क’ संकल्पना


- क्लस्टरमध्ये निवासी बांधकामासोबत व्यावसायिक विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवरही भर देण्यात येणार आहे. ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून घराजवळच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर तलावाचा पुनर्विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरण करून तलावाला मोकळा श्वास मिळवून देण्याचेही त्यांनी सांगितले.
- रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले. विकासकांनी नफा कमी झाला तरी चालेल, मात्र घरांच्या दर्जात तडजोड करू नये, अशी सूचना त्यांनी केली. सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (Eknath Shinde)

Comments
Add Comment

Pune Ganesh Visarjan : पुण्यातील गणोशोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय, घरून बाहेर पडण्यापूर्वी हे रस्ते नक्की तपासा

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे बदल

Karanja Fishermen's Port : करंजा बंदराच्या विकासासाठी 136.76 कोटींचा निधी मंजूर; 21 विकासकामांना मिळणार गती

उरण : करंजा मच्छीमार बंदराच्या विकासासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून 136.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Devendra Fadnavis : दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर, शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार

दुष्काळी भागांतील दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; रब्बी पिकांसाठीही मदत, पाणी-चाऱ्याचे नियोजन मुंबई :

Raj Thackeray : जाती-पातीत अडकू नका, शिक्षणव्यवस्थेतील दोषांवर प्रश्न विचारा ! साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांची भूमिका

विद्यार्थ्यांना आंदोलनाची दिशा भरकटू न देण्याचे आवाहन मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे या २० वर्षीय

Maharashtra Weather : मान्सूनच्या परतीच्या काळात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह 13 राज्यांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात पावसाने

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल

पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या