मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी भूषवलेल्या घटनात्मक पदाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे मुंबई अध्यक्ष व अंधेरी पश्चिमचे आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेच्या १ हजार ९६ शाळांमध्ये बालचित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल १ लाख २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले हाेते. (Amit Satam)
उरण : करंजा मच्छीमार बंदराच्या विकासासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून 136.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक ...
यासंदर्भात माहिती देताना अमीत साटम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरासोबतच लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महानगरपालिका शाळेत बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या पुढाकाराने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. (Amit Satam)
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीज (Moody's) नंतर आता फिच रेटिंग्स (Fitch Ratings) ने ...
‘मेरे सपनों का भारत’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. देशभक्ती, देशप्रेम, समरसता या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवल्या जाव्यात, अशी या चित्रकला स्पर्धेमागे कल्पना होती, असे आमदार अमीत साटम म्हणाले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आमदार अमीत साटम यांनी शिक्षक, पक्षाचे कार्यकर्ते तसेच मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. (Amit Satam)