Devghar On Rent Movie : ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटातील ‘अगं आई गं...’ गाणं रिलीज; गौतमी पाटीलचा ठसकेबाज अंदाज!

मुंबई : अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शनचा संगम असलेला ‘देवघर ऑन रेंट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील ‘अगं आई गं...’ हे जल्लोषपूर्ण गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, त्याला अल्पावधीतच प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे. (Devghar On Rent Movie)



गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी गाण्याला रंगत


आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शन स्वरूप सावंत यांचे असून, संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची आहे. कथा-पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. (Devghar On Rent Movie)



‘अगं आई गं...’ हे गाणे अस्सल मराठमोळा ठेका आणि आधुनिक संगीत यांचा मेळ साधणारे नृत्यगीत आहे. गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदा, मनमोहक हावभाव आणि सहकलाकारांच्या उत्साहामुळे गाण्याला रंगत आली आहे. गीतलेखन संजय नवगिरे, संगीत कबीर शाक्य आणि गायन मुग्धा कऱ्हाडे यांचे आहे.


चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका आहेत. ‘केजीएफ’फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.


संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. कोरिओग्राफी किशोर दळवी, सिनेमॅटोग्राफी चैतन्य साळुंके आणि पार्श्वसंगीत रोहित नागभीडे यांचे आहे. ॲक्शन सीक्वेन्स राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी हाताळले आहेत. (Devghar On Rent Movie)


prahaar.in/2026/09/23/govinda-and-komal-rani-together-at-lalbaugcha-rajas-court-speculation-regarding-disputes-in-their-personal-lives-reignites/

कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके, निर्मिती व्यवस्थापक यश सणस, कला दिग्दर्शक दिलीप कंधारे, वेशभूषाकार अपेक्षा गांधी सोनी आणि रंगभूषाकार सुजीत सुरवसे आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टीमने प्रकाशयोजना, तर विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. (Devghar On Rent Movie)

Comments
Add Comment

Lalbaugcha Raja : गोविंदा आणि कोमल राणी एकत्र लालबागच्या राजाच्या दरबारात; वैयक्तिक आयुष्यातील वादाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई : लालबागच्या राजाच्या दरबारात सध्या बॉलिवूड कलाकारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शाहरुख खान, रणवीर

Sohala Marathi Movie : कुटुंब, नाती आणि आयुष्याच्या नव्या टप्प्याची हळवी कहाणी; ‘सोहळा’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने वेधले लक्ष!

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आगामी ‘सोहळा’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या

72th National Film Award: कार्तिक आर्यन, यामी गौतम अन्...! 'मु. पो. बोंबिलवाडी' ठरला राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी! अशी आहे यादी

मुंबई: संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीचं ज्या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष असतं, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; 75 व्या वर्षी कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला मातृशोक झाला आहे. अभिनेत्रीची आई कृष्णा मुखर्जी यांचं निधन

72nd National Film Awards : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यामी गौतमचा जलवा; पारंपरिक काळ्या साडीत पती आदित्य धरसोबत लावली हजेरी

एकता नगर : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा (Yaami Gautam) अत्यंत सुरेख आणि

Atul Parchure Magazine Movie : आठवणींच्या रूपात 'अतुल परचुरे' पुन्हा भेटीला येणार; ‘मॅगझिन’ चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं २०२४ मध्ये कर्करोगाशी झुंज देताना निधन झालं. त्यांच्या निधनाने