Wednesday, September 23, 2026

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या कोठडीत वाढ तर कल्पना खरातला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या कोठडीत वाढ तर कल्पना खरातला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Ashok Kharat Case : नाशिकच्या बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचारासह अनेकांची आर्थिक लूट ‘मनी ट्रेल’ करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यात मुंबई न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. तर त्याची पत्नी कल्पना हिला या खटल्यात सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करतानान्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.

कल्पना खरातला जामीन मंजूर

त्वरित जामीनदार उपलब्ध नसतील, तर तात्पुरती एक लाख रुपये रक्कम जमा करून सुटकेचे निर्देश देण्यात आले. यासह एक महिन्याच्या आत जामीनदार कोर्टात सादर करणे अनिवार्य असल्याचेही न्यायालयाने सांगितले. तसेच खटल्यातील पुराव्यात छेडछाड, साक्षीदारांवर दबाव न आणणे, कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात न जाणे, प्रत्येक सुनावणीला हजर राहणे आणि ‘ईडी’ने तपासासाठी बोलावल्यास उपस्थित राहणे, या अटी कल्पना खरातला लागू केल्या आहेत.

भोंदू खरात ‘व्हीसी’द्वारे हजर

मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्व संशयितांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, अशोक खरात याला नाशिकरोड कारागृहाने ‘व्हीसी’द्वारे हजर केले तर कल्पना खरात प्रत्यक्ष हजर होती. इतर सर्व संशयित गैरहजर असल्याची नोंद न्यायालयाने केली असून ६ ऑक्टोबर रोजी सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संशयितांमध्ये खरातसह अरविंद पांडुरंग बावके, नामकर्ण यशवंत आवारे, अनिवाश वामन कांडेकर, मिलिंद दादासाहेब बनकर आणि खरातची पत्नी कल्पना अशोक खरात यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >