Baijayant Panda : बैजयंत पांडा भाजपचे नवे महाराष्ट्र प्रभारी

- संघटनात्मक पुनर्रचना; तावडे, सहस्त्रबुद्धे, भरती पवार, मेधा कुलकर्णी यांच्याकडेही विविध राज्यांची जबाबदारी


मुंबई : भारतीय जनता पक्षाने बुधवारी पक्षाच्या राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल केले. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी राज्यसभा खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला अमित मालवीय, गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि दिल्लीच्या खासदार कमलजीत सहरावत यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Baijayant Panda)


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून या नियुक्त्या जाहीर केल्या. देशातील २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी व सहप्रभारींची नवी रचना करण्यात आली आहे. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेत बदल करण्यात आल्याचे या फेरबदलातून स्पष्ट होत आहे. (Baijayant Panda)



महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नव्या टीममध्ये पांडा यांच्यासह अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांचा समावेश आहे. पांडा यांच्यावर महाराष्ट्राच्या संघटनेची प्रमुख जबाबदारी राहणार असून तीन सहप्रभारी त्यांना साथ देतील. या फेरबदलात महाराष्ट्रातील नेत्यांनाही राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारीपद कायम ठेवण्यात आले असून, पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यसभा खासदार भारती पवार यांच्याकडे गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Baijayant Panda)


महाराष्ट्राबरोबरच दिल्लीच्या प्रभारीपदाची जबाबदारी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे देण्यात आली आहे. हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे, तर तमिळनाडू आणि उत्तराखंडची जबाबदारी राम माधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बिहार आणि कर्नाटकसाठी हरीश द्विवेदी, जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी सतीश पुनिया, तर तेलंगणा आणि पश्चिम बंगालसाठी सुनील बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Baijayant Panda)

Comments
Add Comment

Nashik News : अरे देवा ! बैलाने गिळली सोन्याची मंगळसूत्राची पोत, पुढे... ; एक्स-रेनंतर 'या' वस्तूही बैलाच्या पोटात सापडल्या अन् सर्वानाच धक्का बसला

Malegaon News : पोळ्याच्या सणानिमित्त बैलाला नैवेद्य देताना चुकून तब्बल तीन तोळे वजनाची सोन्याची मंगळसूत्राची पोत

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या मिरवणुकीत डीजे-फटाके वाजवणार असाल तर सावधान.. हायकोर्टाच्या 'या' १३ नियमांनी उडाली खळबळ

मुंबई: महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. मात्र, याच उत्सवाच्या

Sunetra Pawar : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय; इच्छुक महिलांशी साधला संवाद

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना

Nashik Kumbh 2027 Health Plan : सिंहस्थासाठी 136 तात्पुरती आरोग्य केंद्रे; 190 रुग्णवाहिका आणि 3,600 अतिरिक्त कर्मचारी तैनात

Nashik Kumbh 2027 Health Plan : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना वेळेत

Ashok Uike : राज्यातील ५५८ अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांची घोषणा

८० टक्क्यांहून अधिक शाळा काँग्रेस नेत्यांशी संबंधित असल्याचा दावा मुंबई : राज्यातील १०० टक्के अनुदानित आदिवासी

समुद्रात जहाजांना पाळावे लागतात वाहतुकीचे नियम! चूक केल्यास भरावा लागतो दंड, कोण फाडतं पावती? जाणून घ्या

रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. सिग्नल, हेल्मेट यासह अनेक वाहतुकीचे