Wednesday, September 23, 2026

Sunetra Pawar : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय; इच्छुक महिलांशी साधला संवाद

Sunetra Pawar : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय; इच्छुक महिलांशी साधला संवाद

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना बारामती येथील राष्ट्रवादी भवनात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. (Sunetra Pawar)

या निवडणुकीसाठी विविध प्रवर्गांतून मोठ्या संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या. विशेषतः महिला प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुनेत्रा पवार यांनी स्वतः महिला इच्छुकांच्या मुलाखती घेत त्यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यासह निवडणुकीसंदर्भातील भूमिका आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासद, कामगार आणि परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी सक्षम व सक्रिय नेतृत्वाला संधी देण्याबाबतही चर्चा झाली. मुलाखतींना इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महिला प्रतिनिधींच्या सहभागामुळे सहकार क्षेत्रातील महिलांची सक्रिय भूमिका अधोरेखित झाली. (Sunetra Pawar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >