MPSC Protest : MPSC आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका; विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे-विक्रम पाचपुते

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर सरकार सकारात्मक भूमिका घेत असून, चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( MPSC protest)


पाचपुते यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांच्या सुरुवातीच्या 12 मागण्यांपैकी 11 मागण्यांवर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवण्याची मागणी घटनात्मक प्रक्रियेशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 317 नुसार आयोगाच्या अध्यक्षांच्या पदावरून हटवण्याबाबतची प्रक्रिया राष्ट्रपतींच्या अधिकाराशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.


विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबर रोजी समिती स्थापन केली असून, या समितीचा दौरा सुरू आहे. विविध ठिकाणी समिती विद्यार्थ्यांशी चर्चा करत असून, आतापर्यंत सुमारे 1100 विद्यार्थी किंवा त्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या शंका आणि मागण्या समितीसमोर मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. (Pune News)



दरम्यान, एमपीएससीच्या आंदोलनात राजकीय नेत्यांचा सहभाग वाढत असल्याचा आरोप पाचपुते यांनी केला. काँग्रेसचे युवक अध्यक्ष आंदोलनात सहभागी झाल्याचा उल्लेख करत त्यांनी राजकीय पक्षांकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर केला जात असल्याचा दावा केला. मात्र, विद्यार्थ्यांनी या आरोपांबाबत स्वतःची भूमिका मांडलेली आहे. (MPSC)


पुण्यात 27 सप्टेंबर रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. रोहित पवार यांनी मात्र आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे.


पाचपुते यांनी विद्यार्थ्यांनी आंदोलनापेक्षा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, यासाठी संवादातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे पाचपुते म्हणाले.


Comments
Add Comment

Mumbai Ganeshotsav : वाडी बंदरच्या महाराजांचे भव्य रूप; बारा ज्योतिर्लिंगांची सजावट ठरतेय यंदाचे खास आकर्षण

मुंबई : मुंबईतील वाडी बंदर परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विराजमान होणारे वाडी बंदरचे महाराज

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करा!

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई :

Mumbai Accident : कुलाब्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू

Diabetes Free Mumbai : भाजपच्या ‘मधुमेहमुक्त मुंबई' अभियानाचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; एकाच दिवशी २८७ आरोग्य शिबिरांमध्ये ७९ हजार ३०६

BMC News : फेरीवाल्यांवरील कारवाईत महापालिका व पोलिसांत समन्वयाचा अभाव!

विधी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्त केली नाराज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस

Deepak Sawant : महापालिका सदस्यत्व रद्द, तरीही उबाठाच्या दिपक सावंत नावापुढे नगरसेवक पदाचा उल्लेख

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे उबाठाचे प्रभाग क्रमांक १११चे