मुंबई : लालबागच्या राजाच्या दरबारात सध्या बॉलिवूड कलाकारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी बाप्पाचे दर्शन घेतले आहे. ( Ganeshotsav 2026) यामध्येच आता प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र गोविंदा त्याच्या कुटुंबासोबत किंवा पत्नी सुनीता आहुजासोबत न जाता, त्याची सह-अभिनेत्री आणि कथित प्रेयसी कोमल राणी स्वर्णकर हिच्यासोबत बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. ( Lalbaugcha Raja Darshan)
पहा व्हिडिओ
View this post on Instagram
गोविंदा आणि कोमल राणी यांच्या दर्शनाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वेळी गोविंदा पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला, तर कोमल राणीने लाल आणि पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. ( Celebrity Ganpati Darshan) दर्शन घेतल्यानंतर गोविंदाने पापाराझींसमोर गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष केला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी एकट्याने जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते, त्यानंतर लगेचच गोविंदा कोमलसोबत तिथे पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे. ( Govinda Latest News)
72th National Film Award: कार्तिक आर्यन, यामी गौतम अन्...! 'मु. पो. बोंबिलवाडी' ठरला राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी! अशी आहे यादी
मुंबई: संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीचं ज्या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष असतं, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 72 वर्षांमध्ये ...
गोविंदा आणि सुनीता यांच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये गोविंदा आणि कोमल मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्यापासून त्यांच्या नात्याच्या अफवांना सुरुवात झाली होती. अद्याप गोविंदा किंवा कोमल यांनी त्यांच्या नात्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र सुनीता आहुजा यांनी गोविंदाच्या या वागण्यावर जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कोमल ही त्याच्या मुलीच्या वयाची असल्याचे सांगत सुनीता यांनी गोविंदावर कडक शब्दांत टीका केली होती. आता सुनीता यांच्या या वक्तव्यानंतर गोविंदा थेट लालबागच्या राजाच्या मंडपात कोमलसोबत दिसल्यामुळे या दोघांमधील वाद अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे. ( Bollywood News)





