Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल


पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनंतर प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा आहे. आरोपी सिया गोयल हिने हत्येनंतर कुटुंबासमोर अधिक दुःखी आणि व्यथित कसे दिसावे, यासाठी चॅटजीपीटी आणि इतर ऑनलाइन साधनांवर शोध घेतल्याचे समोर आले आहे. ( Ketan Agrawal Case)



ChatGPT ला विचारला तो प्रश्न


केतनचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचले असता, सियाच्या वर्तनात अपेक्षित दुःख दिसत नसल्याने कुटुंबाला तिच्यावर संशय आला. हा संशय लक्षात आल्यानंतर घरी परतल्यावर सियाने लोकांसमोर भावनिकदृष्ट्या कसे कोसळावे आणि शोक कसा व्यक्त करावा, याची माहिती ChatGPT आणि इंटरनेटवर शोधल्याचे डिजिटल पुराव्यांवरून उघड झाले आहे.


केतनची मर्डर मिस्ट्री



या गुन्ह्याचा कट रचताना सियाने तिच्या साथीदारांसह पूर्वतयारी केली होती. तिने लोणावळा परिसरातील कड्यावरून पडून झालेल्या अपघातांचा आणि मेघालयातील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्येचा सखोल अभ्यास केला होता. गुन्ह्याची पद्धत, पोलिसांचा तपास आणि आरोपींपर्यंत पोहोचणारे धागेदोरे समजून घेण्यासाठी आरोपींनी इंटरनेटचा वापर केला. ( ChatGPT Search History)


तपासादरम्यान असे दिसून आले की, १८ जून २०२६ रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन तिथून खाली ढकलून देण्यात आले. आरोपींना सुरुवातीला वाटले होते की ते पोलिसांच्या जाळ्यात अडकणार नाहीत. मात्र नंतर भीती वाटू लागल्यावर, अटक झाल्यास चौकशीदरम्यान कसे वागावे आणि घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळावी, याचेही उत्तर त्यांनी ऑनलाइन शोधले होते. ( Police Chargesheet)



सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि त्याचा मित्र रितेश हांगे यांच्यासोबत इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटवरून या सर्व माहितीची देवाणघेवाण केली होती. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून हे सर्व डिजिटल पुरावे जप्त करून न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात जोडले आहेत.

अशातच पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे तपासात समोर आले आहे. सियाच्या गूगल हिस्ट्रीवरून मानसी गोविंदपूरकर नावाच्या तरुणीची माहित मिळाली. सिया या अनेक केसेचा सखोल अभ्यास करत होती असा संशय समोर येत आहे. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर तरुणीचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनांची माहिती आरोपींनी शोधली गेली होती.



Comments
Add Comment

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Sunetra Pawar : दुष्काळी स्थितीमुळे राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले

- नाशिकमध्ये २७ सप्टेंबरला होते नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय मुंबई : दिवंगत अजित पवार

Maharashtra Government : दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द

- कायमस्वरूपी अपंगत्वासाठी प्रमाणपत्र एकदाच; तात्पुरत्या अपंगत्वासाठी पाच वर्षांनी प्रमाणपत्र सादर करण्याची

Eknath Shinde : आधुनिक सुविधांनी सज्ज १०८ रुग्णवाहिका लवकरच सेवेत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत नव्या १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत

Nitesh Rane News: मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री नितेश राणे जिल्हानिहाय दौरा करणार

मुंबई: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

CM Devendra Fadnavis : राजकीय मागण्यांत रस नाही; विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करू! - एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

- पुढील परीक्षेत विक्रमी पदे आणण्याचा निर्णय मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटी