- नाशिकमध्ये २७ सप्टेंबरला होते नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय
मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात संघटनात्मक बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेले राज्यव्यापी शिबिर राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आङे. राज्यातील १९ जिल्ह्यांत पावसाच्या अतिखंडामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली असल्याने पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणारे एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात येत असल्याचे मंगळवारी राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. (Sunetra Pawar)
- उपसमिती गठीत करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश; सीईटी केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर मुंबई : राज्यातील उच्च शिक्षणाच्या सुविधा अधिक ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून हे शिबीर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी येत्या २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आणि विशेषतः महानगरांमधून सुमारे ६०० ते ७५० प्रमुख निमंत्रितांना बोलावण्यात आले होते. या विचारमंथन शिबिरात तरुणाईचा (जेन-झी) मुद्दा आणि पक्षाच्या आगामी अजेंड्याबाबत व्यापक चर्चा करण्यासह पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विचारांची आणि वारशाची मोट बांधून तरुणांना जोडण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार होता. (Sunetra Pawar)
इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी संसदेच्या पटलावर एक विधेयक मांडलं जाणार आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ...
मात्र, दुष्काळी स्थितीत हे शिबिर घेतल्यास जनतेत नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता असल्याने नियोजन लांबणीवर टाकण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात सध्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळी संकटाचा आढावा घेतला जात आहे. १९ जिल्ह्यांतील पीक व चारा पाणी परिस्थिती काळजीची असल्याने शेतकरी हवालदिल आहे. या संवेदनशील भावनेतून पक्षाचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घ्यावे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. (Sunetra Pawar)






