Nashik : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे व सह आयुक्त (अन्न), नाशिक मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत पंचवटी येथील कारवाईत तब्बल ३ लाख १ हजार ९०० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
७५ किलो तूप, ९०० किलो हळद पावडर ताब्यात
२१ सप्टेंबर रोजी मे. श्री बालाजी फूड ट्रेडर्स, शॉप नं. ६७, एपीएमसी शरदचंद्र मार्केट, पेठ रोड, पंचवटी येथे तपासणी करण्यात आली. यावेळी वातुला ब्रँडचे गाईचे तूप ७५ किलो, किंमत ५६ हजार २०० रुपये, तसेच हळद पावडर ९०० किलो, किंमत २ लाख ४५ हजार ७०० रुपये, असा एकूण ३ लाख १ हजार ९०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा संशय तसेच अन्नपदार्थांचा दर्जा व मानवी आरोग्याच्या दृष्टीने सदर साठ्यावर कारवाई करण्यात आली.
Nashik Ganesh Visarjan 2026 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिणाम यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर होणार आहे. अनंत ...
कारवाई मोहीम पुढेही सुरू राहणार
तपासणीदरम्यान अन्नपदार्थाचे नमुने घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. ही कारवाई मंगेश माने, सह आयुक्त (अन्न) आणि ज्ञानेश्वर महाले, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाचत संशय असल्यास अथवा भेसळयुक्त किंवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी https://com-plaints.mahafda.in या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवावी. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची तपासणी व कारवाई मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.






