एक्स-रे तपासणीत पोत अडकल्याचे स्पष्ट
शिवाजी बोरसे यांनी २१ सप्टेंबर रोजी दोन्ही बैलांना चाळीसगाव येथील तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात आणले. पशुवैद्यकीय पथकाने दोन्ही बैलांची सखोल तपासणी केल्यानंतर क्ष-किरण काढले. या तपासणीत सोन्याची पोत नेमक्या कोणत्या बैलाने गिळली आहे, हे समोर आले. तसेच पचनसंस्थेतील रुमेन किंवा रेटिक्युलम यापैकी नेमक्या कोणत्या कप्प्यात पोत अडकली आहे, याचीही माहिती मिळाली. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे योग्य नियोजन करता आले.
Nashik : इगतपुरी तालुक्यातील तीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईला अखेर स्थगिती देण्यात आलीय. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर ...
शस्त्रक्रियेत सोन्याची पोत बाहेर
त्यानंतर संबंधित बैलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेत सुमारे तीन तोळे वजनाची सोन्याची पोत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. पोतीतील ६३ मणी माळेसोबत बाहेर आले, तर उर्वरित ४१ मणीही शोधून काढण्यात आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेदरम्यान बैलाच्या पोटातून इतर वस्तूही बाहेर काढण्यात आल्या. यात टेनिस बॉलच्या आकाराचे दोन प्लास्टिकचे गोळे, नायलॉनची वायर, एक रुपयाचे दोन डॉलर आणि दोन रुपयाचा एक डॉलर यांचा समावेश आहे.
प्लास्टिकच्या वस्तूंमुळेही निर्माण झाला असता धोका
बैलाच्या पोटात आढळलेल्या प्लास्टिकच्या गोळ्यांमुळे भविष्यात त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे सोन्याची पोत बाहेर काढण्यासोबतच या वस्तू बाहेर काढल्याने बैलासाठीही ही शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरली. ही तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया चाळीसगावचे सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन डॉ. शितल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी केली. त्यांना पशुधन पर्यवेक्षक दीपक सपकाळे, अनिल अहिरे आणि गोरख भोई यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले.शस्त्रक्रियेनंतर बैलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, कुटुंबाचा मौल्यवान दागिना पुन्हा मिळाल्याने बोरसे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.