Raigad Crime News : आई-वडिलांमधील घरगुती वाद मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या २४ वर्षीय मुलाचा वडिलांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे घडली आहे. वडिलांनी धारदार चाकूने मुलावर वार केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव साहिल ऊर्फ सई सचिन चिकणे (वय २४) असे आहे. तर या प्रकरणी त्याचे वडील सचिन बजरंग चिकणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nashik Dr Manisha Jejurkar Death Case : गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्या बहीण ...
नेमकं काय घडलं ?
चिकणे कुटुंबीय मूळचे पोलादपूर तालुक्यातील ओंबळी येथील रहिवासी असून सध्या लोहारे देऊळकोंड येथील एका इमारतीत राहत होते. घटनेच्या दिवशी सचिन चिकणे आणि त्यांची पत्नी संध्या चिकणे यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. वाद वाढत असल्याचे पाहून साहिलने मध्यस्थी करत वडिलांना शांत करण्याचा आणि परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार, याच वेळी सचिन चिकणे यांनी स्वयंपाकघरातील धारदार चाकू घेत साहिलवर हल्ला केला. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी सचिन चिकणे घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.दरम्यान, मृत साहिलची आई संध्या चिकणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलादपूर पोलीस ठाण्यात सचिन चिकणे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेत त्याला काही वेळातच ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.





